बांगलादेशातील रोहिंग्या शिबिरांची युनोच्या प्रमुखांकडून पाहणी   

ढाका : बांगलादेशातील रोहिंग्या राहात असलेल्या शिबिरांची पाहणी संयुक्त राष्ट्राचे (युनो) सरचिटणीस ईटोनियो गुटेरीस यांनी केली. सुमारे १० लाख रोहिंग्या नागरिक तेथे राहात आहेत.
म्यानमारमधून लाखोंच्या संख्येने निर्वासित झालेल्या रोहिंग्या नागरिकांनी बांगलादेशात आश्रय घेतला आहे. त्यांच्यासाठी निर्वासित शिबिरे उभारली आहेत. त्याची पाहणी करण्यासाठी गुटेरीस आणि सहकारी आले होते. एकीकडे अमेरिकेच्या जागतिक विकास कार्यक़्रमांसाठी दिला जाणारा निधी रोखला आहे. त्यापैकी अधिकतर निधी बांगलादेशातील रोहिंग्यांच्या पालनपोषणासाठी खर्च केला जात होता. आता निधी बंद झाल्यामुळे त्यांचे पालन पोषण कसे करायचे ? असा प्रश्न शिबिरे चालविणार्‍या संस्थांना पडला आहे. त्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस आणि त्यांचे पथक पाहणीसाठी खास बांगलादेशात आले आणि त्यांनी रोहिंग्या निर्वासित शिबिरांची पाहणी केली आणि तेथील परिथितीचा आढावा घेतला.

रोहिंग्याचे चुकले काय ?

म्यानमारमध्ये बौद्ध धर्मीय बहुसंख्य आहेत. रोहिंग्या मुस्लिम धर्मीयांशी निगडित आहेत. त्यांनी बहुसंख्या बुद्ध धर्मीय नागरिकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या बौध्द समुदायाने विशेषत: धर्मगुरु यांनी रोहिंग्यांविरोधात कडक पावले उचलली. त्या अंतर्गत त्यांचे व्यापार आणि व्यवसाय बंद करत त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या होत्या. बहुसंख्य नागरिकांवर कुरघोडी केल्याचा फटका रोहिंग्यांना बसला. अखेर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांंनी म्यानमारमधून पळ काढला होता. त्यापैकी अनेक जण बांगलादेशात आश्रयास गेले. तसेच ते अन्य देशांत देखील पळून गेले आहेत. बहुसंंख्य नागरिकांशी वितुष्ट घेतल्याचे परिणाम ते सध्या भोगत आहेत. 
 

Related Articles