डेहराडून : आलिशान मोटारीच्या धडकेत बुधवारी चार मजुरांचा मृत्यू झाला होता. दुर्घटनेनंतर चालक पळून गेला होता. त्याला पोलिसांनी डेहराडून येथून अटक केली.वंश कत्याल (वय २२), असे चालकाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील मुरादाबादचा रहिवासी आहे. तो दिल्लीहून डेहराडून येथे आल्यांनंतर पकडले. कत्याल याने मेहुणा जतीन वर्मा यांची गाडी घेतली होती. तो त्याच्या १२ वर्षांचा पुतण्यासह जात असताना मोटारीची धडक बसून चार मजुरांचा मृत्यू उत्तरांचलमध्ये झाला होता. एका दुचाकीची धडक बसून दोन जण जखमी झाले होते. यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला होता. अखेर त्याला डेहराडून येथे अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.
Fans
Followers