काँग्रेसचे माजी आमदार ठाकूर यांच्यावर गोळीबार   

बिलासपूर : हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमधील काँग्रेसचे माजी आमदार बंबर ठाकूर यांच्यावर शुक्रवारी काही अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या निवासस्थानी गोळ्या झाडल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्यात ठाकूर यांच्यासह त्यांचे खासगी सुरक्षा अधिकारी जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी सुमारे १२ गोळ्या झाडल्या, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  ठाकूर हे निवासस्थानाबाहेर अंगणात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी अचानक चौघे जण तेथे आले आणि त्यांनी गोळीबारास सुरूवात केली. ठाकूर यांच्या पायाला गोळी लागली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  गोळीबारानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. ते मुख्य बाजारपेठेच्या दिशेने गेले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हल्लेखोरांना लवकरच अटक केली जाईल असे पोलिस अधीक्षक संदीप धवल यांनी सांगितले.
 

Related Articles