उत्तर प्रदेशात आठ वर्षांत २१० कोटी झाडे लावली   

गोरखपूर : उत्तर प्रदेशात प्रदूषण नियंत्रणासाठी मोठी पावले उचलली आहेत. त्या अंतर्गत गेल्या आठ वर्षां २१० कोटी झाडे लावल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. शहरीकरण आणि औद्योगिक विकास होत असताना राज्यात जंगलांंचे क्षेत्रही वाढल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय स्वच्छ हवा योजनेअंतर्गत आयोजित कार्यक्रमाचा समारोप झाला. त्या वेळी ते बोलत होते.  ते म्हणाले, आता सरकारने १७ महापालिका क्षेत्रात सोलार शहरे निर्माण करण्याचे ठरविले आहे. अयोध्या राज्यातील पहिले सोलार शहर म्हणून उदयास आले आहे. 

Related Articles