ज्येष्ठ अभिनेते, निर्माते देव मुखर्जी यांचे निधन   

मुंबई : 'एक बार मुस्करा दो',' संबंध, आँसू बन गए फूल या चित्रपटांमध्ये नायकाची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते, निर्माते देव मुखर्जी यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. अभिनेते व चित्रपट निर्माते जॉय मुखर्जी यांचे ते बंधू होते. 
 
देव मुखर्जी यांनी १९६० आणि १९७० च्या कालखंडात त्यांनी तू ही मेरी जिंदगी, अभिनेत्री, दो आँखे, बातो बातो में, जो जिता वही सिकंदर, किंग अंकल आणि कमिने सारख्या चित्रपटात भूमिका केली होती.  मिथुन चक्रवर्ती यांची प्रमुख भूमिका असलेला कराटे चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. चक्रवर्तींसह, काजल किरण आणि योगिता बाली यांनी अभिनय केला होता. ते समर्थ -मुखर्जी कुटुंबाशी निगडित होते. अशुतोष गोवारीकर यांचे सासरे आणि अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांचे काका होते. जुहूतील हंस स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले.  काजोल, राणी मुखर्जी, जया बच्चन, आलिया भट्ट, रणबीर कपूर, ऋत्विक रोशन आणि अन्य कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
 

Related Articles