कायद्याने शिक्षा द्या; घर पाडणे योग्य नाही   

सतीश भोसलेच्या घरावर बुलडोझर चालवल्याने दमानिया संतप्त 

मुंबई : सतीश भोसले याने कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या, त्यासाठी कायद्याने त्याला शिक्षा द्या; पण घर का जाळले? हे योग्य नाही, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला.  
 
दमानिया यांनी समाजमाध्यमावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सतीश भोसले याचे घर जाळले, खूप वाईट वाटले. किती क्रूर. परिवाराची काय चूक? दुसर्‍या घरावर बुलडोझर चालवला? हे खूप चुकीचे आहे. सतीश याने कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या, त्यासाठी कायद्याने शिक्षा द्या पण घर का जाळले? हे योग्य नाही, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

Related Articles