गायक हनी सिंगच्या कार्यक्रमात पोलिसांकडून लाठीमार   

पुणे : गायक हनी सिंगच्या खराडी येथील कार्यक्रमात नियोजनापेक्षा जास्त गर्दी झाल्याने  पोलिसांचा मोठा गोधंळ उडाळा. दरम्यान गर्दी नियंत्रणात आणताना पोलिसांकडून प्रवेशद्वारावरच लाठीमार करण्यात आला. 
 
खराडी परिसरात धुळीवंदन सणानिमित्त हनी सिंगचा लाईव्ह कॉन्सर्ट होत आहे. पण या लाईव्ह कॉन्सर्टला पोलिसांनी केलेल्या नियोजनापेक्षा अधिक गर्दी आल्याने गोंधळ उडाला. हनी सिंगच्या कॉन्सर्टसाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. गर्दीला आवरताना पुणे पोलीस हतबल झाले. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली. या घटनेचा चित्रफिती समाज माध्यमावर प्रसिध्द झाली होती. हनी सिंगच्या कार्यक्रमाला शेकडो तरुण-तरुणी आले होते.हनी सिंगचा कार्यक्रमा दरम्यान प्रवेशद्वाराजवळ चाहत्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात येत होता. पोलिसांनी तरुणांना आतमध्ये जाण्यासाठी दरवाजा उघडला आणि लगेच गर्दीचा मोठा लोंढा आतमध्ये शिरला.ही गर्दी इतकी झाली की पोलिसांना त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

Related Articles