E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मटण, मासळीवर ताव मारून धुळवड साजरी
Samruddhi Dhayagude
15 Mar 2025
मटण खरेदीसाठी पुणेकरांच्या रांगा
पुणे : पुणेकरांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही मटण, मासळी, चिकनवर ताव मारून धुळवड साजरी केली. मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी खवय्यांची शुक्रवारी सकाळपासून बाजारात गर्दी झाली होती. विशेष म्हणजे, शहरासह उपनगरांत मटण खरेदीसाठी दुपारपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
होळीच्या दिवशी म्हणजे गुरूवारी बहुतेकांनी पुरणपोळीचा अस्वाद घेतला होता. मात्र, काल खवय्यांनी मटण, चिकन आणि मासळीचे दुकान गाठल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. चिकन आणि मासळीपेक्षा मटण विक्री केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. उपनगरात किमान एक ते दोन तास रांगेत थांबल्याशिवाय मटण मिळत नव्हते. ग्राहकांकडून वाढलेल्या मागणीमुळे मटणाच्या दरात ६० ते ७० रूपयांनी वाढ झाली.
धुळवडीनिमित्त मित्र, नातेवाईक एकत्र येत असतात. धुळवडीनंत्तर एकत्र भोजनाचा आस्वादही घेतला जातो. त्यामुळे मटण, चिकन, मासळी आणि अंड्यांना मोठी मागणी होत असते. काल मटण, चिकन आणि मासळीला हॉटेल व्यावसायिक, तसेच घरगुती ग्राहकांकडून चांगली मागणी होती.
वाढती मागणी लक्षात घेऊन मटण, चिकन आणि मासळी विक्रेत्यांनी अधिकचा माल मागवून ठेवला होता, असे पुणे शहर मटण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले. चिकनच्या मागणीत वाढ झाल्याची माहिती पुणे, पिंपरी-चिंचवड बॉयलर असोसिएशनचे संचालक रुपेश परदेशी यांनी दिली.
गणेश पेठेतील मासळी बाजार, लष्कर भागातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट, कसबा पेठ, पौड रस्ता, पद्मावती, विश्रांतवाडीतील मासळी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. गणेश पेठेतील मासळी बाजारात काल खोल समुद्रातील मासळी १२ ते १५ टन, आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सिलन या मासळीची एकूण मिळून १५ ते २० टन, नदीतील मासळी ७०० ते ८०० किलो, तसेच खाडीतील मासळीची ४०० ते ५०० किलो अशी आवक झाली. पापलेट, रावस, हलवा, सुरमई, ओले बोंबिल, कोळंबी या मासळीचे दर तेजीत असल्याची माहिती गणेश पेठ मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.
प्रतिकिलोचे दर
मटण
७८० ते ८०० रुपये
चिकन
२२० ते २४० रुपये
पापलेट
१००० ते १८०० रुपये
हलवा
६५० ते ८०० रुपये
रावस
७०० ते ९०० रूपये
सुरमई
५०० ते ८०० रुपये
कोळंबी
२४० ते ७०० रुपये
ओले बोंबिल ३०० रुपये
Related
Articles
पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून खोटे हिंदुत्व आयात : ममता
14 Mar 2025
फिनटेक कंपन्यांचा वापर करून फसवणूक करणार्या सहा जणांना अटक
12 Mar 2025
महिला सुरक्षा व संभाव्य उपाययोजना
14 Mar 2025
शांतता... वादळानंतरची की आधीची?
10 Mar 2025
खनिज तेलासाठी अमेरिकेचा आधार
16 Mar 2025
सिरियात गृहयुद्धाचा भडका
10 Mar 2025
पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून खोटे हिंदुत्व आयात : ममता
14 Mar 2025
फिनटेक कंपन्यांचा वापर करून फसवणूक करणार्या सहा जणांना अटक
12 Mar 2025
महिला सुरक्षा व संभाव्य उपाययोजना
14 Mar 2025
शांतता... वादळानंतरची की आधीची?
10 Mar 2025
खनिज तेलासाठी अमेरिकेचा आधार
16 Mar 2025
सिरियात गृहयुद्धाचा भडका
10 Mar 2025
पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून खोटे हिंदुत्व आयात : ममता
14 Mar 2025
फिनटेक कंपन्यांचा वापर करून फसवणूक करणार्या सहा जणांना अटक
12 Mar 2025
महिला सुरक्षा व संभाव्य उपाययोजना
14 Mar 2025
शांतता... वादळानंतरची की आधीची?
10 Mar 2025
खनिज तेलासाठी अमेरिकेचा आधार
16 Mar 2025
सिरियात गृहयुद्धाचा भडका
10 Mar 2025
पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून खोटे हिंदुत्व आयात : ममता
14 Mar 2025
फिनटेक कंपन्यांचा वापर करून फसवणूक करणार्या सहा जणांना अटक
12 Mar 2025
महिला सुरक्षा व संभाव्य उपाययोजना
14 Mar 2025
शांतता... वादळानंतरची की आधीची?
10 Mar 2025
खनिज तेलासाठी अमेरिकेचा आधार
16 Mar 2025
सिरियात गृहयुद्धाचा भडका
10 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)