निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेसला जेजुरीत थांबा   

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे ते कोल्हापूर या लोहमार्गावरील जेजुरी रेल्वेस्थानकावर हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अल्पवेळ थांबेल, तर सह्याद्री एक्स्प्रेस पुढील महिन्यापासून मुंबईपर्यंत धावणार आहे. याबाबतचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. पुणे - कोल्हापूर लोहमार्गावरील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी आळंदी (म्हातोबाची) या रेल्वे स्थानकाला भेट दिली. जेजुरी हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण औद्योगिक वसाहतीचे महत्त्वपूर्ण शहर आहे, रेल्वे स्थानकापासून केवळ १४ कि.मी.वर अष्टविनायकातील पहिले स्थान मोरगाव आहे.

Related Articles