E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये रंगणार अंतिम सामना
Samruddhi Dhayagude
15 Mar 2025
मुंबई : महिला प्रीमियर लीग च्या तिसर्या हंगामात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने एलिमिनेटरच्या लढतीत गुजरात जाएंट्सला पराभूत करत फायनल गाठली आहे. आज मुंबई इंडियन्स महिला संघ दुसर्यांदा चषक उंचावण्याच्या इराद्याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात मैदानात खेळताना दिसेल. याधी २०२३ मध्ये पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
एलिमिनेटरच्या लढती पहिल्यांदा फलंदाजी करताना मेथ्यू हेली आणि नॅटली सायव्हर ब्रंट यांनी केलेल्या १३५ धावांच्या भागीदारी आणि हरमनप्रीत कौरच्या १२ चेंडूतील ३६ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ४ बळीच्या मोबदल्यात २१३ धावा करत गुजरात जाएंट्स संघासमोर २१४ धावांचे टार्गेट दिले होते. या धावांचा पाठलाग करताना गुजरात जाएंट्सचा संघ १९.२ षटकात १६६ धावांतच आटोपला. मुंबई इंडियन्सच्या संघानं ४७ धावांनी विजय मिळवत फायनल गाठली. दिल्ली कॅपिटल्सचा संघ सलग तिसर्यांदा अंतिममध्ये पोहचला आहे. पण त्यांना अजूनपर्यंत ट्रॉफी जिंकता आलेली नाही. २०२३ च्या पहिल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला संघ यांच्यातच अंतिम सामना रंगल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी मुंबई इंडियन्सने बाजी मारत पहिल्या ट्रॉफीवर नाव कोरले. २०२४ च्या दुसर्या हंगामातही दिल्ली कॅपिटल्सचा संघ अंतिममध्ये पोहचला. पण गत हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं त्यांना शह दिला.
आता पुन्हा दिल्ली कॅपिटल्स महिला संघासमोर मुंबई इंडियन्सचे आव्हान असणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येणार असल्यामुळे हरमनप्रीत कौरच्या संघाला दुसर्यांदा ट्रॉफी उंचावण्याची अधिक संधी असेल.
गुजरात जाएंट्स संघाने नाणेफेक जिंकून या सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यास्तिका भाटियाच्या रुपात मुंबई इंडियन्स महिला संघाने अवघ्या २६ धावांवर पहिली बळी गमावला. त्यानंतर नॅटली सायव्हर आणि हेली मेथ्यूज जोडी जमली. दोघींनी दुसर्या बळीसाठी १३५ धावांची भागीदारी करच संघाला मजबूत स्थितीत आणले . हेली मॅथ्यूज ५० चेंडूत बाद झाल्यावर कर्णधार हरमनप्रीत कौरने नॅटलीसोबत डाव पुढे नेला. नॅटली ४१ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. हरमनप्रीत कौरने १२ चेंडूत तुफान फटकेबाजीसह ३६ धावा केल्यामुळे मुंबई इंडियन्स महिला संघाने निर्धारित २० षटकात ४ बळीच्या मोबदल्यात धावफलकावर २१३ धावा लावल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरातच्या ताफ्यातील एकीलाही मोठी धावसंख्या करता आली नाही.
डॅनियेल गिब्सन ३४ (२४), फीबी लिचफिल्ड ३१ (२०) आणि भारती फुलमाली ३० (२०) धावा वगळता कुणालाही मैदानात जम धरता आला नाही. मुंबई इंडियन्सकडून फलंदाजीत तोरा दाखवणार्या मेथ्यू हेलीनं गोलंदाजीतही चमक दाखवत ३ बळी घेतल्या. तिच्याशिवाय अमेलिया कर हिने २ तर शबनील इस्माइल आणि नॅट ब्रंट या दोघींनी प्रत्येकी एक-एक बळी टिपला.
Related
Articles
कुलभूषण जाधव अपहरण प्रकरण
10 Mar 2025
फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर
12 Mar 2025
वडगावशेरीत पाणी टंचाई
11 Mar 2025
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
देशभर होळी उत्साहात; संभळमध्येही शांततेत
15 Mar 2025
दिल्लीत लाडक्या बहिणींना मिळणार अडीच हजार रूपये
10 Mar 2025
कुलभूषण जाधव अपहरण प्रकरण
10 Mar 2025
फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर
12 Mar 2025
वडगावशेरीत पाणी टंचाई
11 Mar 2025
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
देशभर होळी उत्साहात; संभळमध्येही शांततेत
15 Mar 2025
दिल्लीत लाडक्या बहिणींना मिळणार अडीच हजार रूपये
10 Mar 2025
कुलभूषण जाधव अपहरण प्रकरण
10 Mar 2025
फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर
12 Mar 2025
वडगावशेरीत पाणी टंचाई
11 Mar 2025
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
देशभर होळी उत्साहात; संभळमध्येही शांततेत
15 Mar 2025
दिल्लीत लाडक्या बहिणींना मिळणार अडीच हजार रूपये
10 Mar 2025
कुलभूषण जाधव अपहरण प्रकरण
10 Mar 2025
फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर
12 Mar 2025
वडगावशेरीत पाणी टंचाई
11 Mar 2025
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
देशभर होळी उत्साहात; संभळमध्येही शांततेत
15 Mar 2025
दिल्लीत लाडक्या बहिणींना मिळणार अडीच हजार रूपये
10 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)