आयपीएलमध्ये हॅरी ब्रूकवर २ वर्षांची बंदी   

मुंबई : इंग्लंड क्रिकेटपटू हॅरी ब्रूकवर बीसीसीआयकडून २ वर्षांची आयपीएल बंदी घालण्यात आली आहे. सलग दुसर्‍या वर्षी हॅरी ब्रूकने शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने बंदी बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने बंदीचे पत्र हॅरी ब्रूक आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाला पाठवले आहे. आयपीएलच्या लिलावात एकदा संघाने विकत घेतल्यास खेळाडुंना माघारीस मनाई आहे. हॅरी ब्रूकला दिल्ली कॅपिटल्सने ६ कोटी २५ लाखांना विकत घेतले होते. 
 
 हॅरी ब्रूकवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. हॅरी ब्रूक आता दोन वर्षांच्या बंदीनंतरच आयपीएलमध्ये खेळू शकेल. एका मीडिया रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी ब्रूकने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल २०२५ मधून आपले नाव मागे घेतल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हा कठोर निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार इंडियन प्रीमियर लीगमधून २ वर्षांच्या बंदीला सामोरे जाणारा हॅरी ब्रुक पहिला क्रिकेटपटूही बनला आहे. 
 
दरम्यान, बीसीसीआयने आयपीएलमधील सर्व १० फ्रँचायझींच्या मागणीवरून हा नियम बनवला कारण विशेषतः इंग्लंडमधील खेळाडू स्पर्धा सुरू होण्यापूर्वी खेळण्यास नकार देत असतात.आयपीएल २०२५ चा शुभारंभ ८ दिवसांनी म्हणजेच २२ मार्चपासून होणार आहे, तर अंतिम सामना २५ मे २०२५ रोजी खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला. आयपीएलच्या इतिहासामध्ये रिषभ पंत यांच्यावर लखनौ सुपर जायंट्सने सर्वाधिक मोठी बोली लावून त्याला संघात घेतले. 
 
चेन्नई सुपर किंग्सने या लिलावात एकूण २५ खेळाडू खरेदी केले. त्यात ७ परदेशी खेळाडू आहेत. दिल्ली कॅपिटल्सने २३ खेळाडूंना खरेदी केले. त्यात ७ परदेशी खेळाडू आहेत. गुजरात टायटन्सने ७ परदेशी खेळाडूंसह एकूण २५ खेळाडूंना खरेदी केले. कोलकाता नाईट रायडर्सने ८ परदेशी खेळाडूंसह २१ खेळाडूंना खरेदी केले. लखनौ सुपर जायंट्सने एकूण २४ खेळाडूंना खरेदी केले. त्यात ६ परदेशी खेळाडू आहेत. मुंबई इंडियन्सने २३ खेळाडू घेतले. त्यात ८ परदेशी आहेत. पंजाब किंग्जने २५ खेळाडू खरेदी केले. त्यात ८ परदेशी आहेत. राजस्थानने ६ परदेशी खेळाडूंसह २० खेळाडूंना खरेदी केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २२ खेळाडू घेतले. त्यात ८ परदेशी आहेत. सनरायझर्स हैदराबादने २० परदेशी खेळाडूंना खरेदी केले. त्यात ७ परदेशी आहेत.

Related Articles