सनातन धर्मामुळे लाभली उत्सवांची समृद्ध परंपरा   

आदित्यनाथ यांचे गौरवोद्गार 

गोरखपूर : अन्य धर्माच्या तुलनेत उत्सवाची परंपरा केवळ सनातन धर्माने  जपली आहे, असे गौरवोद्गार उत्तर प्रदेशाचे मुख्यमत्री योगी आदित्यनाथ यांनी होळनिमित्त आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी काढले. उत्सवाची परंपरा भारतात यापुढेही सुरूच राहील, असेही ते म्हणाले.
 
होळीनिमित्त गोरखपूर येथे  पारंपरिक नरसिंह देवाची मिरवणूक काढण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, होळीचा सण देशाच्या ऐक्याचा संदेश घेऊन आला आहे. एक भारत श्रेष्ठ भारताचा दृष्टिकोन या निमित्ताने साकार होत आहे. 
 
ते म्हणाले, जगातील कोणत्याही देशात, जातीत आणि धर्मात सनातन धर्माप्रमाणे उत्सवाची परंपरा नाही. आमचा विश्वास सनातन धर्मावर असून उत्सव आमचा आत्मा आहे. भविष्यातही उत्सवाचा वारसा भारत पुढे चालवत राहणार आहे. सनातन धर्माला विरोध करणार्‍यांना आता त्याचे सामर्थ्य कळून चुकले आहे. प्रयागराज येथील महाकुभ मेळ्यात ६६ कोटी भाविकांनी स्नान करुन जागतिक विक्रम केला आहे. जात आणि धर्माच्या आधारे कोणताही भेदभाव महाकुंभ मेळ्यात झाला नव्हता. या संदभार्ंतील एक प्रश्न प्रेक्षकांतून विचारला होता. त्यावर ते म्हणाले, राम मंदिराला विरोध करणारे आणि गोमातेच्य चोरटा व्यपाराला चालना देणारेच देशात विभाजनाची बीजे पेरत आहेत. त्यांचा खटाटोप केवळ सत्ता प्राप्तीसाठी आहे. भारत कधीच विकसित भारत होणार नाही, असे सांगणारी मंडळी देशविरोधी आणि सनातन धर्माच्या विरोधात वल्गना करत आले आहेत. आता सनातन धर्माची उत्सवाची परंपरा पुढे सुरूच राहिल. महाकुंभ त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. मिरवणुकीपूर्वी आदित्यनाथ यांनी साधू आणि संतावर फुलांचा वर्षाव केला. त्यांचे आशिर्वाद घेतले. 
 

Related Articles