राजकोटमध्ये आगीत होरपळून तिघांचा मृत्यू   

४० जणांची सुखरुप सुटका

राजकोट : गुजरातमधील राजकोट शहरात शुक्रवारी सकाळी एका १२ मजली निवासी इमारतीला भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून एक जण जखमी आहेत. तर, इमारतीत अडकलेल्या ४० रहिवाशांची  सुखरुप सुटका करण्यात आली.
 
१५० फूट रिंग रोड परिसरात अटलांटिस अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरील एका सदनिकेत काल सकाळी साडेनऊच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली.या आगीत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. तर एका जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे सहायक पोलिस आयुक्त बी.जे. चौधरी यांनी सांगितले. 
 
आगीची माहिती मिळता अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठ्या शर्थीने आग आटोक्यात आणली.मृतांपैकी दोघांची ओळख पटली आहे. कल्पेश लेउवा आणि मयूर ल्युवा अशी त्यांची नावे आहेत. मात्र,  तिसर्‍या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. विशेष म्हणजे, मृतांपैकी दोघे बाहेरचे होते. काही कामानिमित्त ते इमारतीत आले होते, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 

Related Articles