शैक्षणिक मान्यतेसाठी अर्ज करण्याचे आवाहन   

नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग पात्र उच्च शिक्षण संस्थेने शैक्षणिक वर्ष जुलै- ऑगस्ट २०२५-२०२६ साठी मुक्तपणे आणि ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी मान्यता घेण्याकरता आजपासून (शुक्रवार) अर्ज करावेत. हे अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून करावेत. ज्या शिक्षण संस्था प्रत्यक्ष दस्तावेज सादर करून मान्यता घेऊ इच्छितात, त्यांनी आयोगाच्या फिरोजशाह मार्गावरील कार्यालयात अर्ज जमा करावेत, असे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांनी केले. 
 
शैक्षणिक मान्यतेसाठीचे हे अर्ज ३ एप्रिल २०२५ पर्यंत भरता येतील. विद्यापीठ नियम ३ (अ) वर्ष २०२० नुसार अर्ज मागवले जात आहेत. ज्या शिक्षण संस्था प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज सादर करणार आहेत, त्यांच्यासाठी शेवटची तारीख १५ एप्रिल २०२५ ठेवण्यात आली आहे. शिक्षण संस्थांना अधिकची माहिती हवी असेल तर त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या युजीसी, एसी.इन या संकेतस्थळांना भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

Related Articles