पाकिस्तानच्या लष्करी तळावर आत्मघातकी हल्ला   

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील जंडोला लष्करी तळावर गुरूवारी आत्मघातकी हल्ला झाला. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. जंडोला लष्करी तळाच्या तपासणी नाक्यावर काल सायंकाळी एका हल्लेखोराने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाकिस्तानी सैन्याने त्याला रोखले. मात्र, हल्लेखोराने लष्करी तळात वाहन घुसवून स्फोट घडवून आणला. यात हल्लेेखोराचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर सक्रिय असलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे सांगण्यात येते.   
 

Related Articles