शहबाज शरीफ यांची बलुचिस्तानला भेट   

कराची : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी गुरुवारी बलुचिस्तान प्रांताला भेट दिली. तसेच, कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. जाफर एक्स्प्रेस अपहरणाच्या घटनेने पाकिस्तानात खळबळ माजली होती. शरीफ यांनी नागरिकांना एकजुटीने राहण्यास सांगितले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) मंगळवारी जाफर एक्स्प्रेसचे अपहरण केले होते. ही रेल्वे क्वेट्टाहून पेशावरकडे निघाली होती. या रेल्वेत ४४० प्रवासी होते. बीएलएने एका बोगद्यात स्फोट घडवत रेल्वे रोखली होती. यावेळी बीएलए आणि पाकिस्तानी सैनिकांत चकमक उडाली होती. यामध्ये २१ नागरिकांसह ४  सैनिक ठार झाले होते. तर, पाकिस्तानी सैनिकांनी बीएलएच्या सर्व ३३ बंडखोरांना ठार मारले होते. बीएलए हे स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करत आहेत. त्यासाठी ते अनेक वर्षांपासून लढा देत आहेत.
 
शरीफ यांच्यासोबत उपपंतप्रधान महमद इसहाक डार, माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार, केंद्रीय नियोजन, विकास मंत्री अहसान इक्बाल, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री नवाबजादा मीर खालिद मगसी आदी उपस्थित होते.
 

Related Articles