भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले   

मुंबई : चॅम्पियन्स चषक स्पर्धेनंतर भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले आहेत. मुंबईच्या विमानतळावर सर्वात आधी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली उतरलेले दिसले. त्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या संघाने हार्दिक पांड्याच्या मायदेशातील एन्ट्रीची खास झलक दाखवली.मुंबई इंडियन्सच्या संघाने अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन खास फोटा  ओळीसह हार्दिक पांड्याच्या फोटोसह कडक एन्ट्रीचा व्हिडिओ शेअर केला आहे.  यात  हार्दिक पांड्याची कडक स्टाइल अन् त्याचा स्वॅग पाहायला मिळतो.  सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता चांगलाच चर्चेचा विषय ठरतो.
 
३१ वर्षीय हार्दिक पांड्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत संघाच्या विजयात मोलाचा  वाटा उचलला होता. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रात त्याने उपयुक्त कामगिरीसह आपल्यावरील जबादारी पार पाडली.भारतीय संघाने अतिरिक्त फिरकीपटूला संधी देण्यासाठी फक्त शमीच्या रुपात फक्त एकमेव प्रमुख जलदगती गोलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले. पांड्यावर दुसर्‍या जलदगती गोलंदाजाची उणीव भरून काढण्याची जबाबदारी पडली, ती त्याने पेलूनही दाखवली.
 
चॅम्पियन्स चषक स्पर्धेनंतर हार्दिक पांड्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सज्ज झाला.गत हंगामातही हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भुषविताना दिसेल. पण १४ पैकी फक्त ४ सामन्यातच संघाला विजय मिळवता आला. रोहित शर्मा असताना त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी दिल्याचे अनेकांना खटकले.पण त्यानंतर टी-२० विश्वचषक  आणि आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेत रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात कमालीचे समीकरण दिसून आले आहे. जे गत हंगामात घडले. ते विसरून मुंबईचा संघ  यावेळी पुन्हा चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज असेल.  
 

Related Articles