E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तानच्या मदतीने बांगलादेशात बंडाचे कारस्थान?
Wrutuja pandharpure
12 Mar 2025
आयएसआय, लेफ्टनंट रहमान आणि जमातची बैठक
ढाका
: पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयच्या चिथावणीवरून बांगलादेशाचे लेफ्टनंट जनरल फैजुर रहमान बंड करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. लष्करप्रमुख वकार उज्जमान यांच्याविरोधात त्यांनी लष्करी उठावाची तयारी सुरू केली होती. त्यासाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात एक बैठकही घेतली होती. याची कुणकूण लागताच लष्कर प्रमुख वकार यांन यांनी रहमान यांच्यावर कारवाईचा फास आवळला आहे. लष्कराच्या गुप्तचर विभागाला त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
लेफ्टनंट जनरल फैजुर रहमान हे पाकिस्तानचे जवळचे आणि पाकिस्तान पुरस्कृत जमातचे समर्थक आहेत. त्यांचे आयएसआयशी घनिष्ट संबंध असून त्यांनी लष्करप्रमुख वकार उज्जमान यांच्याविरोधात लष्करात फूट पाडून बंड करण्याचा घाट घातला होता. त्यासाठी त्यांनी जानेवारीत जमातचे नेते आणि पाकिस्तानी मुत्सद्दी यांची भेट घेतली होती. या बैठकींची माहिती बांगलादेशच्या लष्करप्रमुखांना देण्यात आली. यानंतर रहमान यांच्या हालचालीवर लष्कराचा गुप्तचर विभाग डीजीएफआयकडून लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, बांगलादेशात राजकीय गोंधळ सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी लष्करप्रमुख वकार यांनी सर्व नेत्यांनी देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होईल, असे प्रकार करु नयेत, असा इशारा दिला होता. नेत्यांनी भांडून त्यात अडकून राहू नये, असे सांगितले होते. जर नागरिक मतभेद विसरू शकत नसतील किंवा एकमेकांवर आरोप करणे थांबवू शकले नाहीत तर देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होईल.
महिला रस्त्यावर उतरल्या
बांगलादेशात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. युनूस सरकारच्या विरोधात महिलांनी निदर्शने केली. अनेक जिल्ह्यांमध्ये दररोज मुलींवर बलात्कारर होत आहेत. त्यामुळे संतप्त महिला रस्त्यावर उतरल्या. त्यांनी वाढत्या गुन्ह्यांविरोधात जोरदार निदर्शने केली. निदर्शनांदरम्यान, लहान मुलांवरील बलात्काराच्या आणखी सहा घटनांची नोंद झाली आहे. या प्रकरणीं सात जणांना नुकतीच अटक करण्यात आली. सर्व पीडित मुले सहा ते चौदा वयोगटातील आहे. खोटे आरोप आणि बदनामी केल्यामुळे एका किशोरवयीन मुलीने आत्महत्या केली होती. त्यामुळे महिलांच्या संतपात भर पडली.
Related
Articles
टेस्लाच्या मोटारींकडे ग्राहकांची पाठ
10 Mar 2025
ओडिशात ४१ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे : माझी
11 Mar 2025
आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढीची मागणी
10 Mar 2025
'डिजिटल अरेस्ट'विरोधात सरकारची कारवाई
14 Mar 2025
शाबासकी नको; पण बदनामी करू नका
08 Mar 2025
पीएमपीच्या डेपोत खासगी बससाठी जागा देण्याचा विचार
10 Mar 2025
टेस्लाच्या मोटारींकडे ग्राहकांची पाठ
10 Mar 2025
ओडिशात ४१ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे : माझी
11 Mar 2025
आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढीची मागणी
10 Mar 2025
'डिजिटल अरेस्ट'विरोधात सरकारची कारवाई
14 Mar 2025
शाबासकी नको; पण बदनामी करू नका
08 Mar 2025
पीएमपीच्या डेपोत खासगी बससाठी जागा देण्याचा विचार
10 Mar 2025
टेस्लाच्या मोटारींकडे ग्राहकांची पाठ
10 Mar 2025
ओडिशात ४१ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे : माझी
11 Mar 2025
आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढीची मागणी
10 Mar 2025
'डिजिटल अरेस्ट'विरोधात सरकारची कारवाई
14 Mar 2025
शाबासकी नको; पण बदनामी करू नका
08 Mar 2025
पीएमपीच्या डेपोत खासगी बससाठी जागा देण्याचा विचार
10 Mar 2025
टेस्लाच्या मोटारींकडे ग्राहकांची पाठ
10 Mar 2025
ओडिशात ४१ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे : माझी
11 Mar 2025
आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढीची मागणी
10 Mar 2025
'डिजिटल अरेस्ट'विरोधात सरकारची कारवाई
14 Mar 2025
शाबासकी नको; पण बदनामी करू नका
08 Mar 2025
पीएमपीच्या डेपोत खासगी बससाठी जागा देण्याचा विचार
10 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा