E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
सायबर चोरांकडून एक कोटींची फसवणूक
Wrutuja pandharpure
12 Mar 2025
पुण्यात सायबर चोरीचे सत्र सुरूच
पुणे
: शेअर बाजारात गुंतवणूक, तसेच वेगवेगळ्या प्रकारची अमिषे दाखवून सायबर चोरट्यांकडून सामान्य नागरिकांची फसवणूक करण्याचे सत्र सुरू आहे. शहरातील वेगवेगळ्या घटनेत सायबर चोरटयांनी तक्रारदारांची तब्बल एक कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या अमिषाने फसवणूक करण्याचे दोन वेगवेगळे गुन्हे वाघोली पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. पहिल्या घटनेत वाघोली भागात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची ३९ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याबाबत ४८ वर्षाच्या तक्रारदाराने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अशाच प्रकारे आणखी एकाची ३४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी सायबर चोरट्यांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड करत आहेत.
नवीन गॅस जोड देण्याच्या अमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची चार लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत एका तरुणाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार तरुण कात्रज भागातील आंबेगाव परिसरात वास्तव्यास आहे. चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. गॅस कंपनीकडून नवीन गॅस जोड देण्यात येणार आहे. गॅस जोड नोंदणीसाठी वैयक्तिक माहिती द्यावी लागेल, असे अमिष दाखवून चोरट्यांनी त्याला जाळ्यात ओढले. चोरट्यांनी तक्रारदार तरुणाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर तरुणाच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने चार लाख ४० हजार रुपये चोरट्यांनी काढून चोरले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने करत आहेत.
कारवाईच्या भीतीने फसवणूक
काळ्या पैशाच्या व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आला असून, याप्रकरणात पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी हडपसर भागातील एका तरुणाची ३२ लाख रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर चोरट्यांनी तक्रारदाराला धमकावून वेळोवेळी पैसे घेतले. तसेच, याच भागातील एकाची चोरट्यांनी बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी करुन दोन लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे करत आहेत.
Related
Articles
आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल
12 Mar 2025
भारतचं चॅम्पियन
10 Mar 2025
कुलभूषण जाधव अपहरण प्रकरण
10 Mar 2025
पीएमपीच्या नादुरूस्त बस मोडीत
12 Mar 2025
अबू आझमी यांना न्यायालयाने फटकारले
14 Mar 2025
आयजीआय : अनमोल हिरा
10 Mar 2025
आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल
12 Mar 2025
भारतचं चॅम्पियन
10 Mar 2025
कुलभूषण जाधव अपहरण प्रकरण
10 Mar 2025
पीएमपीच्या नादुरूस्त बस मोडीत
12 Mar 2025
अबू आझमी यांना न्यायालयाने फटकारले
14 Mar 2025
आयजीआय : अनमोल हिरा
10 Mar 2025
आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल
12 Mar 2025
भारतचं चॅम्पियन
10 Mar 2025
कुलभूषण जाधव अपहरण प्रकरण
10 Mar 2025
पीएमपीच्या नादुरूस्त बस मोडीत
12 Mar 2025
अबू आझमी यांना न्यायालयाने फटकारले
14 Mar 2025
आयजीआय : अनमोल हिरा
10 Mar 2025
आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल
12 Mar 2025
भारतचं चॅम्पियन
10 Mar 2025
कुलभूषण जाधव अपहरण प्रकरण
10 Mar 2025
पीएमपीच्या नादुरूस्त बस मोडीत
12 Mar 2025
अबू आझमी यांना न्यायालयाने फटकारले
14 Mar 2025
आयजीआय : अनमोल हिरा
10 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा