E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मालमत्ता सील
Wrutuja pandharpure
12 Mar 2025
महापालिकेच्या कर आकारणी विभागाची कारवाई
पुणे
: सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट यांनी कर न भरल्याने ’न्यायालयाचा अवमाना केल्या प्रकरणी याचिका दाखल केली आहे. ही याचिका दाखल असताना न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तसेच महापालिकेच्या वकीलांचा कायदेशीर सल्ला घेवून कर आकारणी विभागाने कोंढवा बु. आणि वडगाव ब्रु. या भागातील इन्स्टिट्यूटच्या मिळकतींना सील ठोकले.
सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट यांच्या पुण्यात १२८ मिळकती आहेत. त्यांची थकबाकी ३४५ कोटी एवढी आहे. परंतु कोंढवा बु., आंबेगाव बु., एरंडवणे या मिळकती व्यतिरिक्त इतर सर्व मिळकतीवर ’कोणतीही जबरदस्ती नाही’ असे न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे एरंडवणे येथील मिळकतीवर थकबाकी रक्कम ४७ कोटी ४३ लाख १८ हजार ३०३ रुपये एवढी असल्याने मिळकतीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे नियम ४२ नुसार जप्तीची कारवाईृ ६ डिसेंबर रोजी करण्यात आली. तसेच यापूर्वी देखील केलेली जप्तीची कारवाई योग्य असून तात्काळ १२ कोटी इतकी रक्कम भरणेबाबत न्यायलयाने आदेशित केले होते.
महापालिकेच्या कर विभागाने महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसूल करण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत, थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई नोटिसा देऊन केली जात आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तसेच वकीलांनी दिलेल्या कायदेशीर सल्ल्यानुसार सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मालमत्ता सील करण्यात आल्या. अशी माहिती महापालिकेच्या कर विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.
शहरातील ४३८ शासकीय मिळकतींची ९३.२४ कोटी इतकी थकबाकी आहे. याबाबत सदरची थकबाकी वसूल करणेबाबत शासकीय मिळकत धारकांकडे पाठपुरावा सुरु आहे. तसेच पुणे शहरातील टॉप १०० थकबाकीदार मिळकत धारकांची ३३४.१० कोटी इतकी थकबाकी आहे.
सर्वाधिक करथकबाकी फुरसुंगीचे संतोष काटेवाल यांची १८ कोटी ४४ लाख ३७ हजार ५८५ रुपये इतकी आहेत. दुसर्या क्रमांकावर हडपरमधील योगेश इस्टेट एनव्ही यांच्याकडे १७ कोटी १६ लाख ५ हजार ६५१ रुपये इतकी थकबाकी आहे. तर तिसर्या क्रमांकावर उरुळी देवाची या गावातील गणेश मोरे यांची १६ कोटी ९९ लाख ५३ हजार ६५३ रुपेय इतकी कर थकबाकी आहे. याच प्रमाणे एकूण १०० टॉप मिळकत कर थकबाकीदारांच्या मिळकती जप्त केल्या जाणार असल्याचे मिळकत कर विभागाने दिली.
मुख्य कार्यालय सील
मिळकत कर थकबाकी धारकांकडून थकबाकी वसुली करण्यासाठी पथके काम करत आहेत. ज्या मिळकत धारकांनी कराचा भरणा केला नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. सिंहगड इन्स्टिट्युटच्या मालमत्ता थेट सील केल्या जात नाही. तर त्यांच्या मुख्य कार्यालयांना सील ठोकण्यात आले आहे. शाळा, कॉलेज असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाते. थकबाकी वसूल केली जाणार आहे.
- माधव जगताप, प्रमुख, मिळकत कर आकारणी विभाग, महापालिका
Related
Articles
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचे भर रस्त्यात अश्लील चाळे
08 Mar 2025
भारताकडे आशिया चषकाचे यजमानपद
12 Mar 2025
दिल्लीत लाडक्या बहिणींना मिळणार अडीच हजार रूपये
10 Mar 2025
मुंबई इंडियन्सचा शानदार विजय
08 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
करातील बदलामुळे वाहन मालकांना फटका
11 Mar 2025
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचे भर रस्त्यात अश्लील चाळे
08 Mar 2025
भारताकडे आशिया चषकाचे यजमानपद
12 Mar 2025
दिल्लीत लाडक्या बहिणींना मिळणार अडीच हजार रूपये
10 Mar 2025
मुंबई इंडियन्सचा शानदार विजय
08 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
करातील बदलामुळे वाहन मालकांना फटका
11 Mar 2025
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचे भर रस्त्यात अश्लील चाळे
08 Mar 2025
भारताकडे आशिया चषकाचे यजमानपद
12 Mar 2025
दिल्लीत लाडक्या बहिणींना मिळणार अडीच हजार रूपये
10 Mar 2025
मुंबई इंडियन्सचा शानदार विजय
08 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
करातील बदलामुळे वाहन मालकांना फटका
11 Mar 2025
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचे भर रस्त्यात अश्लील चाळे
08 Mar 2025
भारताकडे आशिया चषकाचे यजमानपद
12 Mar 2025
दिल्लीत लाडक्या बहिणींना मिळणार अडीच हजार रूपये
10 Mar 2025
मुंबई इंडियन्सचा शानदार विजय
08 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
करातील बदलामुळे वाहन मालकांना फटका
11 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा