E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
उच्च पदांवर महिलांचे वर्चस्व परंतु..?
Wrutuja pandharpure
12 Mar 2025
माझेही मत
भारतातील कंपनी क्षेत्रांत काही वर्षांपूर्वी महिलांचा सहभाग एक कंपनी कर्मचारी या नात्याने होत असे. परंतु हे चित्र गेल्या दहा वीस वर्षांपासून बदलत गेले आहे. आता कंपन्यांतील महिलांचा सहभाग उच्च - मध्यम पदांवर वाढत्या प्रमाणात होत आहे असे दिसून येत आहे. सन २००४ मध्ये देशात उच्च पदांवर नेमणूक झालेल्या महिलांची संख्या ११.७ टक्के इतकी होती ती यावर्षी ३६.५ टक्क्यांवर पोहोचली आहे. त्याला कारणीभूत आहे ते म्हणजे महिलांनी व्यावसायिक क्षेत्रांतील प्राप्त केलेले शिक्षण, काम करण्याची इच्छा आणि सांस्कृतिक बदल. या सर्वांना कंपनी क्षेत्राने मान्य करून घेत तेथील व्यवस्थापकीय संचालकांनी महिलांच्या काम करण्याच्या पद्धती, तत्परता ओळखून त्यांना उच्च पदांवर रुजू करून घेतले आहे. त्यातही वरिष्ठ व्यवस्थापनात भारतीय महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असल्याने जगातील सर्वोच्च पदांवर सर्वाधिक महिला भारतात आहेत असे आघाडीची कर आणि सल्लागार कंपनी ग्रँट थॉर्नटन यांनी वूमन इन बिझनेस २०२५ या त्यांच्या अहवालात म्हटले आहे. भारतीय कंपनी क्षेत्रांतील सीइओ, सीओओ, सीएफओ, सीआयओ, एचआर, सीएमओ अशी वरिष्ठ म्हणून ओळखल्या जाणार्या पदांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत चांगल्याच टक्केवारीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. असे असले तरीही वेतनाच्या बाबतीत लिंगभावानुसार असमानता बाळगली जात आहे ही गंभीर समस्या बनली आहे. भारतातील वेतनाच्या बाबतीत असणारा भेदभाव हा मुंबई, बंगळुरू, दिल्ली या शहरांतील कंपन्यांच्या वेतन तफावतींमधून स्पष्टपणे दिसून येतो. तसाच तो बीएफएसआय, एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रांतील कंपन्यांच्या वेतनाच्या बाबतीत दिसतो म्हणजेच उच्च स्थानावर जरी महिला पोहोचल्या तरी पगार म्हणून त्या कमाईच्या बाबतीत मागेच आहेत. २ ते ५ लाख रुपये प्रतिवर्षी कमावणार्या महिला आणि ५० लाखांहून अधिक वेतन घेणार्या महिलांपैकी अगदी नाममात्र महिलांनी याची दखल घेऊन जॉब प्लेसमेंट प्लॅटफॉर्मवरील द अनफिल्टर्ड ट्रूथ:- व्हॉट विमेन प्रोफेशनल्स रिअली वॉन्ट या अहवालात नोंद करून घेतली आहे. यावरून महिला जरी उच्च शिक्षण घेऊन उच्च पदांवर पोहोचल्या असल्या तरीही त्यांना कमाईच्या बाबतीत पुरुषांसमान मागे ठेवले जात आहे असे आढळून येते. कमाईतील फरक भरून काढण्यात महिला स्वबळावर स्वतःला न्याय मिळवून घेण्यात यशस्वी होतील असा विश्वास वाटतो.
राजन पांजरी , जोगेश्वरी
Related
Articles
पंजाबमध्ये युट्यूबरच्या घरावर बॉम्ब हल्ला
17 Mar 2025
छत्तीसगढमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासह अनेकांंवर ईडीचे छापे
11 Mar 2025
झोपडपट्टी फेरविकासाच्या वादातून हाणामारी
12 Mar 2025
कर्नाटकातील होबाळी येथे कमाल तपमानाची नोंद
15 Mar 2025
तुलसी गब्बार्ड येणार भारत दौर्यावर
12 Mar 2025
घरगुती सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरून काळाबाजार

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
अमेरिकेत मंदीची शक्यता?
6
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी