E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
शांतता... वादळानंतरची की आधीची?
Wrutuja pandharpure
10 Mar 2025
धनंजय दीक्षित
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तेजी वाल्यांच्या आटोकाट प्रयत्नांमुळे २२,००० ही भक्कम समजली जाणारी निफ्टी ची आधार पातळी निफ्टी ने खालच्या दिशेला भेदली नव्हती. परंतु सोमवारी मागील पानावरुन पुढे चालू केल्याप्रमाणे मंदी वाल्यांनी विक्रीचा भरपूर दबाव आणून बाजार नरमच ठेवला. मंगळवारी तर निफ्टीचा खुलता भावच २१,९७४.४५ असा लागला .... लगेच भाव तिथे देव किंवा भाव भगवान छे ही ब्रीद वाक्य मानणार्यांनी निराशाजनक सूर लावायला सुरुवात केली. अर्थात बहुमताच्या बरोबर उलट्या दिशेलाच जायचे हा नियम बाजारानेही काटेकोरपणे पाळला - २१,९६४.६० असा सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी लागलेल्या नीचतम भावा नंतरचा नीचतम भाव निफ्टी ने लावला खरा परंतु तिथून उसळी घेऊन २२,०८२ ह्या भावपातळीवर (म्हणजे खुलत्या भावाच्या वर) जेमतेम निफ्टी बंद झाला. अशा वेळेस ऐकू येणारी नेहमीची वाक्ये म्हणजे... भारतीय शेयर बाजार आता मंदीच्या विळख्यात अडकला छोट्या गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगावी सोन्यातील गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरेल का? इ. विविध प्रसारमाध्यमांवर लगेच झळकू ही लागली.
ह्यावेळेस मात्र हे होण्याची संधी बाजाराने दिलीच नाही. बुधवारी तेजीवाल्यांनी खरेदीचा जोर लावून तब्बल २५४ अंकांची म्हणजे (१ टक्क्याहून अधिक) घसघशीत वाढ निफ्टी मध्ये घडवून आणली. ह्यात मंदी वाल्यांची, शॉर्ट पोझिशन कमी करण्यासाठी केलेली खरेदी पण जोडीला होतीच. शेयर बाजारात ज्या अतिशय कमी शाश्वत बाबी आहेत त्यापैकी एक म्हणजे पंटर लोकांचा पळपुटेपणा मग ते तेजीवाले असोत कि मंदीवाले. जरा बाजार दिशा बदलतोय असे वाटले, की सगळे तोंड फिरवून बदललेल्या दिशेला पळायला तत्पर, अर्थात अस्थिर बाजारात हा पळपुटेपणा नक्कीच उपयोगी पडतो. परंतु ह्यामुळेच जेव्हा बाजार दिशा बदलतो तेव्हा सुरुवातीला बदलाचा वेग प्रचंड असू शकतो.
अर्थात जगात ज्या ज्या गोष्टींमध्ये व्यापार होतो तिथे हे पंटर असतातच व तिथेही त्यांची सौदे करण्याची पद्धत हीच असते, मग ते सोने असो अथवा चांदी अथवा कच्चे तेल अथवा चलन (करन्सी). सगळीकडे हीच तर्हा. सध्या ट्रम्प ह्यांच्या नवनवीन घोषणांमुळे डॉलर निर्देशांक वाढतो-पडतो, त्याच अनुषंगाने तेलाचे, सोन्याचे, चांदीचे भाव बदलतात व त्या बदलाच्या वेगामध्ये सौदेबाजांची ही मानसिकता गडद रंग भरते अशी स्थिती आहे. असो.. शुक्रवारी बाजार चालू होतानाच सौदेबाजांनी घेतलेला सावध पवित्रा कळून आला. आधीच दोन दिवसांची तेजी, त्यातून शनिवार रविवार बाजार बंद राहणार आणि ह्यामध्ये अमेरिकेत काय घडामोडी - घोषणा होऊ शकतात ह्याचा काहीच अंदाज नाही. अशा परिस्थितीमध्ये नवीन तेजी - मंदी करून वीकएंड ची झोप कोण घालवणार?? तरी देखील फारशी वध - घट न होता निफ्टी २२,५५२. ५० अशा सन्माननीय पातळीवर बंद झाला व सर्वांनाच हायसे वाटले. तर थोडक्यात सांगायचे म्हणजे, बाजाराच्या नाकाशी जे सूत धरायला लागेल असे वाटले होते, तसे न होता सध्या तरी बाजाराला आय सी यू मधून डिस्चार्ज मिळाला आहे.
Related
Articles
शहबाज शरीफ यांची बलुचिस्तानला भेट
14 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Mar 2025
कुलदीपने उडविला रचिन रवींद्रचा त्रिफळा
10 Mar 2025
एसटी बसमध्ये विनयभंग करणारा जेरबंद
10 Mar 2025
वक्फ विधेयक, मतदान ओळखपत्रावरुन संसदेत वादळी चर्चा शक्य
10 Mar 2025
पुण्याच्या लौकिकाला काळिमा
10 Mar 2025
शहबाज शरीफ यांची बलुचिस्तानला भेट
14 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Mar 2025
कुलदीपने उडविला रचिन रवींद्रचा त्रिफळा
10 Mar 2025
एसटी बसमध्ये विनयभंग करणारा जेरबंद
10 Mar 2025
वक्फ विधेयक, मतदान ओळखपत्रावरुन संसदेत वादळी चर्चा शक्य
10 Mar 2025
पुण्याच्या लौकिकाला काळिमा
10 Mar 2025
शहबाज शरीफ यांची बलुचिस्तानला भेट
14 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Mar 2025
कुलदीपने उडविला रचिन रवींद्रचा त्रिफळा
10 Mar 2025
एसटी बसमध्ये विनयभंग करणारा जेरबंद
10 Mar 2025
वक्फ विधेयक, मतदान ओळखपत्रावरुन संसदेत वादळी चर्चा शक्य
10 Mar 2025
पुण्याच्या लौकिकाला काळिमा
10 Mar 2025
शहबाज शरीफ यांची बलुचिस्तानला भेट
14 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Mar 2025
कुलदीपने उडविला रचिन रवींद्रचा त्रिफळा
10 Mar 2025
एसटी बसमध्ये विनयभंग करणारा जेरबंद
10 Mar 2025
वक्फ विधेयक, मतदान ओळखपत्रावरुन संसदेत वादळी चर्चा शक्य
10 Mar 2025
पुण्याच्या लौकिकाला काळिमा
10 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा