E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मेट्रोचा नवा मार्ग; निगडी, रावेत, वाकड, नाशिक फाट्यामार्गे चाकण
Wrutuja pandharpure
10 Mar 2025
पिंपरी
: पिंपरी-चिंचवड शहरात दापोडी ते निगडी या मेट्रोमार्गानंतर दुसरा मार्ग करण्यात येत आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, तो लवकरच पिंपरी-चिंचवड महापालिकेस सादर केला जाईल. नवीन मेट्रो मार्ग निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापासून, रावेत, वाकड बायपास, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा यामार्गे तो चाकणपर्यंत असणार आहे. या नव्या मार्गामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा ७५ टक्के भाग मेट्रोशी जोडला जाणार आहे.
तीस लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या आणि झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरासाठी नवीन मेट्रो मार्गाची विविध संघटना आणि संस्थांकडून सातत्याने मागणी केली जात आहे. नागरिकांचा रेटा लक्षात घेऊन महापालिकेने निगडी ते चाकण असा नवीन मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यास महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (महामेट्रो) सांगितले आहे. त्यानुसार महामेट्रोकडून आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या मार्गाद्वारे शहराचा दक्षिण भाग तसेच भोसरीकडील भाग मेट्रोने जोडला जाणार आहे. वाकड आणि पिंपळे सौदागर हा उच्चभ्रू आणि आयटीचा परिसर मेट्रोने जोडला जाणार आहे. या संपूर्ण मार्गामुळे तसेच निगडी ते दापोडी मार्गामुळे पिंपरी-चिंचवडचा ७५ टक्के भाग मेट्रोशी जोडला जाणार आहे.
महामेट्रोकडून येत्या ४ ते ५ महिन्यांत आराखडा तयार होण्याची शक्यता आहे. त्या आराखड्याला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन तो मंजुरीसाठी राज्य व नंतर केंद्र शासनाकडे पाठविला जाईल. केंद्राने मान्यता दिल्यानंतर या नव्या मेट्रो मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान दीड ते दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.नाशिक फाटा ते चाकणच्या जुन्या आराखड्यात होणार बदलपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सूचनेवरून नाशिक फाटा ते चाकण या मार्गाचा महामेट्रोने दोन वेळा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला. पहिल्यांदा निओ मेट्रोचा आराखडा तयार केला होता. त्यानंतर सुधारणा करून मेट्रोचा आराखडा तयार केला गेला. आता पुणे ते नाशिक महामार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विकसित करणार आहे. तो आठ पदरी ‘एलिव्हेडेट कॉरिडॉर’ असणार आहे. तो मार्ग नाशिक फाटा येथून सुरू होणार आहे. त्यामुळे मेट्रोचा आराखडा पुन्हा बदलला जाणार आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाशी समन्वय साधून मेट्रोचा नव्याने सुधारित डीपीआर तयार करण्यात येणार आहे.
असा असेल नवीन मार्ग
निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक स्टेशन, रावेत, मुकाई चौक, पुणे-मुंबई-बंगळुरू महामार्ग, वाकड बायपास, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, भोसरी, मोशी, चाकण असा हा मार्ग आहे. अंदाजे ३५ ते ४० किलोमीटर अंतराचा हा मार्ग आहे.
Related
Articles
कुकी भागातील जनजीवन विस्कळीत
10 Mar 2025
नवीन महाबळेश्वर प्रकल्प म्हणजे जैवविविधता संकटात येण्याची पायाभरणी!
12 Mar 2025
सतीश भोसले रहात असलेली जागा देखील वन विभागाची!
10 Mar 2025
भारताच्या विजयाचा शहरात जल्लोष
10 Mar 2025
सायबर चोरांकडून एक कोटींची फसवणूक
12 Mar 2025
सय्यद आबिद अली यांचे निधन
14 Mar 2025
कुकी भागातील जनजीवन विस्कळीत
10 Mar 2025
नवीन महाबळेश्वर प्रकल्प म्हणजे जैवविविधता संकटात येण्याची पायाभरणी!
12 Mar 2025
सतीश भोसले रहात असलेली जागा देखील वन विभागाची!
10 Mar 2025
भारताच्या विजयाचा शहरात जल्लोष
10 Mar 2025
सायबर चोरांकडून एक कोटींची फसवणूक
12 Mar 2025
सय्यद आबिद अली यांचे निधन
14 Mar 2025
कुकी भागातील जनजीवन विस्कळीत
10 Mar 2025
नवीन महाबळेश्वर प्रकल्प म्हणजे जैवविविधता संकटात येण्याची पायाभरणी!
12 Mar 2025
सतीश भोसले रहात असलेली जागा देखील वन विभागाची!
10 Mar 2025
भारताच्या विजयाचा शहरात जल्लोष
10 Mar 2025
सायबर चोरांकडून एक कोटींची फसवणूक
12 Mar 2025
सय्यद आबिद अली यांचे निधन
14 Mar 2025
कुकी भागातील जनजीवन विस्कळीत
10 Mar 2025
नवीन महाबळेश्वर प्रकल्प म्हणजे जैवविविधता संकटात येण्याची पायाभरणी!
12 Mar 2025
सतीश भोसले रहात असलेली जागा देखील वन विभागाची!
10 Mar 2025
भारताच्या विजयाचा शहरात जल्लोष
10 Mar 2025
सायबर चोरांकडून एक कोटींची फसवणूक
12 Mar 2025
सय्यद आबिद अली यांचे निधन
14 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा