E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
अवैध प्रवासी वाहतुकीवर पोलिसांची कारवाई
Wrutuja pandharpure
07 Mar 2025
केसरीचा दणका
बारामती
,(प्रतिनिधी): वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून सुरू असलेल्या खासगी अवैध वाहतुकीला आता बारामतीच्या वाहतूक पोलिसांनी दणका दिला आहे. चार प्रवासी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्यावर न्यायालयात खटले पाठविले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
दै. केसरीमध्ये २८ फेब्रुवारी रोजी बस स्थानक सुसज्ज या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यामध्ये बस स्थानकात प्रवाशांना होणार्या गैरसोयी यावर वृत्त प्रकाशित केले होते, त्याची दखल घेत बारामतीच्या वाहतूक पोलिसांनी बस स्थानकावर होणार्या अवैध वाहतुकीवर कारवाई करीत पोलिसी खाक्या दाखवत दणका दिला.बारामती बसस्थानक परिसरात सुरु असलेल्या अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई केली असून त्यामध्ये मारुती सुझुकी इको, मारुती ओमीनी, मारुती सुझुकी इको, महिंद्रा ऍपे अशा एकूण चार वाहनांचा समावेश आहे.
पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या अनुचित प्रकारानंतर आता बारामतीच्या वाहतूक शाखेनेही कंबर कसली आहे. अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती बसस्थानक परिसरात वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.
वाहतूक नियमांना आणि महिला सुरक्षेला प्राधान्य देत हे पाऊल टाकण्यात आले आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे वाहतूक नियमांची पायमल्ली होते. प्रमाणापेक्षा अधिक प्रवाशी बसवून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो. अनेकवेळा अपघात घडतात त्यानंतर कायदेशीररीत्या भरपाई मिळण्यास अनेक अडचणी निर्माण होतात. याबाबत वृत्तपत्रांनीही आवाज उठवला होता. रस्ता सुरक्षा, पार्किंग, नायलॉन दोरीचा प्रयोग, फॅन्सी नंबर, फटाका सायलेंसर, रेसिंग कार, पार्किंग साठी प्रयत्न, वाहन परवाना, ट्रिपल सीट आदी कारवायानंतर आता खासगी अवैध वाहतुकीला चाप बसविण्यासाठी बारामती वाहतूक पोलीस प्रयत्न करत आहेत. या कारवाईला २ हजार ते ५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे.
त्यामुळे यापुढेही कारवाईचा बडगा सुरूच राहणार असल्याचे यादव यांनी सांगितले.ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, वाहतूक पोलीस जवान सुभाष काळे, सुधाकर जाधव, प्रदीप काळे, अशोक झगडे, सिमा साबळे, रूपाली जमदाडे आदींनी केली आहे.
’सर्वांनीच वाहतूक नियमांचे पालन करावे. जर कोणी वाहतूक नियमांची पायमल्ली करताना मिळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. वाहतूक नियम मोडणार्यांची वेळीच माहिती द्यावी.
- चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक
Related
Articles
अस्थिर परिस्थितीमुळे चीनची सुवर्णखरेदी
10 Mar 2025
ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली करणार्यास रेस्टॉरंट चालकांना दणका
14 Mar 2025
कोचीतील वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त
14 Mar 2025
ना घी, ना बडगा... शिळ्या कढीला तडका!
12 Mar 2025
जीएसटी सुटसुटीत हवा; काँग्रेसची केंद्राकडे मागणी
10 Mar 2025
वाचक लिहितात
10 Mar 2025
अस्थिर परिस्थितीमुळे चीनची सुवर्णखरेदी
10 Mar 2025
ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली करणार्यास रेस्टॉरंट चालकांना दणका
14 Mar 2025
कोचीतील वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त
14 Mar 2025
ना घी, ना बडगा... शिळ्या कढीला तडका!
12 Mar 2025
जीएसटी सुटसुटीत हवा; काँग्रेसची केंद्राकडे मागणी
10 Mar 2025
वाचक लिहितात
10 Mar 2025
अस्थिर परिस्थितीमुळे चीनची सुवर्णखरेदी
10 Mar 2025
ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली करणार्यास रेस्टॉरंट चालकांना दणका
14 Mar 2025
कोचीतील वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त
14 Mar 2025
ना घी, ना बडगा... शिळ्या कढीला तडका!
12 Mar 2025
जीएसटी सुटसुटीत हवा; काँग्रेसची केंद्राकडे मागणी
10 Mar 2025
वाचक लिहितात
10 Mar 2025
अस्थिर परिस्थितीमुळे चीनची सुवर्णखरेदी
10 Mar 2025
ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली करणार्यास रेस्टॉरंट चालकांना दणका
14 Mar 2025
कोचीतील वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त
14 Mar 2025
ना घी, ना बडगा... शिळ्या कढीला तडका!
12 Mar 2025
जीएसटी सुटसुटीत हवा; काँग्रेसची केंद्राकडे मागणी
10 Mar 2025
वाचक लिहितात
10 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा