व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांची बैठक   

नवी दिल्ली : काश्मीर एकता दिनानिमित्त व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीला जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर- ए-तैयबाच्या वरिष्ठ कमांडरसह हमासचे वरिष्ठ प्रतिनिधीही सहभागी झाले होते.रावळकोट येथील शहीद साबीर स्टेडियममध्ये ही बैठक पार पडली. काश्मीर सॉलिडॅरिटी अँड हमास ऑपरेशन ‘अल अक्सा फ्लड’ कॉन्फरन्स असे या बैठकीचे नाव होते. या बैठकीला जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ तल्हा सैफ, जैशचा कमांडर असगर खान काश्मिरी, हमासचा इराणमधील प्रतिनिधी डॉ. खालिद 
 
अल-कदुमीने हा देखील उपस्थित होता. अल-कदुमीने याचा पीओकेचा हा पहिलाच दौरा होता. या बैठकीत हमासशी संबंधित अनेक पॅलेस्टिनी नेते देखील उपस्थित होते. अल-कदुमीने जमियत उलेमा-ए-इस्लामचा प्रमुख मौलाना फजलुर रहमान याच्याशीही स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीमुळे पाकिस्तानची दहशतवादी कारवायांना सतत पाठिंबा देण्याची भूमिका पुन्हा उघड झाली आहे.

Related Articles