कॅलिफोर्नियाला भूकंपाचा धक्का   

सॅनडियागो : अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्निया परिसराला नुकताच भूकंपाचा धक्का बसला. सॅनडियागोजवळ झालेला भूकंप ५.२ रिश्टर स्केल क्षमतेचा होता. अर्थात त्यात प्राणहानी किंवा मालमत्तेची हानी झाली नसल्याचे वृत्त आहे. 
 
अमेरिकेच्या भूगर्भ पाहणी विभागाने सॅनडियागोच्या पूर्वेकडेचे पर्वतीय शहर ज्युलियन येथे भूकंप झाल्याचे म्हटले आहे. हादरा सॅनडियागो ते उत्तरेकडेच्या लॉसएंजलीसपर्यंत जाणवले. ज्यलियन शहराच्या दक्षिणेकडे चार किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. समाज माध्यमांवर भूकंपाच्या हादर्‍याची चर्चा होती. एकाने दुकानातील कप हादर्‍याने पडल्याचे म्हटले असून दुसर्‍याने मालमत्तेची हानी झाली नसल्याचे सांगितले. 

Related Articles