बनावट पासपोर्ट प्रकरण   

पश्चिम बंगालमध्ये ईडीने घातले छापे

कोलकाता : बनावट पासपोर्टचे जाळे उद्ध्वस्त करण्याची मोहीम पश्चिम बंगालमध्ये राबविण्यात आलीआहे. त्या अंतर्गत राज्यातील विविध ठिकाणी ईडीने मंगळवारी छापे घातले. 
 
राजधानी कोलकातातील बॅकबगान परिसर तसेच २४ परगणा जिल्ह्यात, नादिया जिल्ह्यातील गेडे आणि अन्य पाच ठिकाणी छापे घातले. बनावट पासपोर्ट तयार करणार्‍या टोळीतील दलालांची एक यादी तयार केली आहे. त्या यादीनुसार कारवाई हाती घेतली असल्याचे ईडीच्या अधिकार्‍यांनी सांगितले. कोलकाता पोलिसानी यापूर्वी दहा जणांना अटक केली होती. त्यात एका निवृत्त पोलिस अधिकार्‍याचा समावेश आहे. मार्चमध्ये कोलकाता पोलिसांनी न्यायालयात एक आरोपपत्र दाखल केले होते. त्यात १३० जण बनावट पोसपोटर्ंच्या गैरव्यवहारात असल्याचे नमूद केले होते. त्यात दहा भारतीय आणि उर्वरित बांगलादेशातील असल्याचे म्हटले आहे. 

Related Articles