बीजिंग : चीनची निर्यात मार्चमध्ये १२ टक्क्यांनी वाढली आहे. या उलट निर्यात मात्र, ४.३ टक्क्यांनी घसरली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढीव आयात शुल्क लादण्याची घोषणा केल्यानंतर चीनच्या उद्योग विश्वात खळबळ उडाली. मालांची निर्यात वाढविण्यासाठी धडपड सुरू झाली. आयात सुमारे ४.३ टक्के घसरली. चीन हा जगातील दुसरी आर्थिक महासत्ता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्था ५.८ टक्के वाढली होती. या उलट आयात ७ टक्के कमी झाली. निर्यात २७.६ अब्ज डॉलर्सने वाढली. पहिल्या चौमाहीत ती ७६.६ अब्ज डॉलर्स एवढी होती. दरम्यान, अमेरिकेने चीनवर १४५ टक्के आयात शुल्क लावले आहे. नंतर मात्र मागे घेत असल्याची घोषणा केली. दरम्यान, आग्नेय आशियात चीनची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्के वाढ झाली. आफ्रिकेतही ११ टक्के निर्यात झाली. चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांनी सोमवारपासून आशियातील देशांच्या दौर्यास सुरुवात केली. त्या अंतर्गत ते प्रथम व्हिएतनाम नंतर मलेशिया आणि कंबोडियाला जात आहेत. तेथे निर्यात वाढविण्यावर त्यांनी भर दिला.
Fans
Followers