गुंतवणूकदारांनी गमावले १२ लाख कोटी   

मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढीव आयात शुल्क  लागू केल्याचा फटका शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बसला. त्यांनी आतापर्यंत सुमारे १२ लाख कोटी रुपये गमावल्याची आकडेवारी पुढे आली आहे.शेअर बाजाराचा निर्देशांक सुमारे २ टक्क्यांनी घसरला होता. अत्यंत अस्थिर वातावरणाचा फटका समभागांच्या किंमतीवर झाला. पर्यायाने गुंतवणूकदारांचे ११.३० लाख कोटी बुडाले. २ एप्रिल रोजी सेन्सेक्स १ हजार ४६० ने घसरला होता. सरासरी १.९० टक्के घसरण झाली होती. सेन्सेक्समधील कंपन्योंचे भांडवल ११ लाख ३० हजार ६२७.०९ कोटींवरून घसरून ते ४ लाख १ हजार ६७. ५६८ कोटींपर्यंत पोहोचले. ९० दिवस शुल्क लागू केले जाणार नाही, अशी घोषणा अमेरिकेकडून होताच निर्देशांक २ टक्के पुन्हा वाढला.  महवीर जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमुळे  बाजार १० आणि १४ एप्रिल रोजी बंद होता. दरम्यान, अन्य देशांच्या तुलनेत वाढीव आयात शुल्क भारतासाठी कमी आकारले गेले आहे. ही बाब जमेची आहे. पण, शुल्क वाढीचा धसका गुंतवणूकदारांनी घेतल्याचे स्पष्ट होत आहे. अमेरिकेच्या निर्णयाचा अन्य देशांच्या शेअर बाजाराबरोबरच देशांतर्गत झाला, अशी माहिती लेमन मार्केट डेस्कचे विश्लेषक सतीश चंद्रा अलुरी यांनी दिली. 
 

Related Articles