बांगलादेशाची धर्मनिरपेक्ष संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न : हसीना   

नवी दिल्ली : स्वातंत्र्यविरोधी शक्तींनी बेकायदेशीरपणे बांगलादेशची सत्ता काबीज केली आहे. ते देशाची धर्मनिरपेक्ष संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेने अशा अतिक्रमणकर्त्यांना हुसकावून लावावे, असे आवाहन बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केले.हसीना यांनी पोहेला बैशाख, बंगाली नववर्षानिमित्त जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पूर्वी जेव्हा-जेव्हा स्वातंत्र्यविरोधी शक्ती सत्तेवर आल्या, तेव्हा त्यांनी देशाचा इतिहास, वारसा आणि संस्कृतीवर हल्ला केला. त्यांनी मंगल शोभा यात्रा केवळ रोखण्याचाच प्रयत्न केला नाही तर त्याचे नाव बदलण्याचाही प्रयत्न केला.
 
जे आता बांगलादेश चालवतात ते राष्ट्राचे शत्रू आणि आपल्या संस्कृतीचे शत्रू आहेत. आपण स्वातंत्र्यविरोधी आणि संस्कृतीविरोधी शक्तींना दूर करू आणि बांगलादेशचे डोके जागतिक स्तरावर उंच करू.बंगाली नववर्षाच्या या शुभ प्रसंगी, आपण सर्व अस्वास्थ्यकर, कुरूप किंवा विकृत संस्कृतीचा भाग नाकारण्याची शपथ घेऊ आणि निरोगी, सुंदर आणि सर्जनशील जीवनशैली स्वीकारू.इस्लामिक शक्तीने देशावर वर्चस्व गाजवले आहे. हंगामी सरकारचे प्रमुख असलेले महम्मद युनूस बांगलादेशीची ओळख नष्ट करत आहेत. ग्रामीण बँकेतही मोठा गैरव्यवहार केला आहे, असेही हसीना यांनी म्हटले आहे. 
 

Related Articles