नवी दिल्ली : अमरनाथ यात्रेसाठी सोमवारपासून नावनोंदणी सुरू झाली. यंदा अमरनाथ यात्रा २५ जुलै २०२५ रोजी सुरू होत असून ती ९ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालणार आहे. दरवर्षी या यात्रेत देश-विदेशातील हजारो भाविक सहभागी होऊन बाबा बर्फानी यांचे आशीर्वाद घेतात. या यात्रेत दररोज केवळ १५ हजार भाविकांना सहभागी होता येणार आहे. त्यामुळे, भाविक नावनोंदणीची वाट पाहत असतात. भाविकांना श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड (एसएसबी) च्या संकेतस्थळावरुन नोंदणी करता येते. या यात्रेत गर्भवती महिला, ७० वर्षांवरील व्यक्ती आणि १३ वर्षांखालील मुलांना सहभागी होता येत नाही.
Fans
Followers