आयसीसी पुरूष क्रिकेट समितीच्या चेअरमनपदी सौरव गांगुली   

नवी दिल्‍ली : भारताचे माजी खेळाडू आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांना आयसीसीने मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांना पुन्हा एकदा आयसीसी मेंस क्रिकेट समितीच्या चेअरमन पदी निवडण्यात आले आहे. गांगुली यांना पहिल्यांदा चेअरमन पद २०२१ मध्ये देण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी अनिल कुंबळे यांची जागा घेतली होती. त्याआधी अनिल कुंबळे यांनी त्यांचे तीन कार्यकाल समाप्त केले होते. गांगुली यांच्याशिवाय व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांना सुद्धा या समितीचा हिस्सा बनवण्यात आले होते.
 
सौरव गांगुली यांच्यासहित आयसीसीच्या मेन्स क्रिकेट समितीच्या सदस्यांमध्ये वीवीएस लक्ष्मण, अफगाणिस्तानचे माजी खेळाडू हमीद हसन, दक्षिण आफ्रिकाचे कसोटी आणि वनडे संघाचे कर्णधार टेंबा बावुमा आणि इंग्लंडचे माजी खेळाडू जोनाथन ट्रॉट सामील आहेत.दुसरीकडे आयसीसीच्या महिला क्रिकेट समिती बद्दल बोलायचे झाल्यास, तर न्युझीलंडची माजी ऑफ — स्पिन गोलंदाज कैथरीन कैम्पबेल यांना चेअरपर्सन म्हणून निवडण्यात आले आहे. महिला समितीमध्ये त्यांच्याशिवाय ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू एवरिल फाही त्यांच्यासोबत फ्लोत्सी मोसेकी हे देखील सामील आहेत.
 
आयसीसीने आत्ताच बीसीसीआय, इसीबी आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड सोबत मिळून एक नवी सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आल्यानंतर महिलांना क्रिकेट खेळण्यापासून थांबवण्यात आले होते. आता आयसीसीद्वारे नव्या सुरुवातीनंतर अफगाणिस्तानच्या महिला खेळाडूंना वित्तीय मदतीसोबत ट्रेनिंगसाठी विश्वस्तरीय सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.आयसीसीचे चेअरमन जय शाहने या नव्या गोष्टीवर आनंद व्यक्त केला आहे, त्यांचे म्हणणे होते की ही गोष्ट महिला खेळाडूंमध्ये एक नवी आशा निर्माण करेल.

Related Articles