भाजप आणि संघ आंबेडकर यांचे शत्रू   

खर्गे यांची टीका

नवी दिल्ली : मोदी सरकार केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत आहे. वास्तविक, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आंबेडकर यांचे शत्रू आहेत, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी केला. यासोबतच, राज्यघटनेची मूल्ये जपण्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस नेहमीच वचनबद्ध राहील, असेही खर्गे यावेळी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, काँग्रेसने आंबेडकर यांचा अपमान केला होता, असा आरोप केला. मोदी यांच्या आरोपाचे खंडन करताना खर्गे यांनी भाजप आणि संघावर जोरदार टीकास्त्र सोडले.
 
डॉ. आंबेडकर यांनी अनुसूचित जातींच्या सक्षमीकरणासाठी आजीवन संघर्ष केला. राज्यघटनेच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान आहे. ते देशाचे पहिले कायदा मंत्री होते. देशाच्या प्रगतीसाठी आणि एकात्मतेसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. सर्वांच्या हक्कांचे रक्षण केले, असेही खर्गे यावेळी म्हणाले.
 
सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक न्यायासाठी काँग्रेसची नेहमीच अतूट बांधिलकी राहिली आहे. आम्ही राज्यघटनेच्या मूल्यांसाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी सदैव वचनबद्ध राहू, असेही खर्गे म्हणाले.यावेळी खर्गे यांनी जातीनिहाय जनगणनेची गरज व्यक्त केली. खासगी शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अन्य मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू करण्याची मागणी केली. राज्यघटना देशवासीयांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा अधिकार देते, असेही खर्गे म्हणाले. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवली पाहिजे, असेही ते म्हणाले.

दलित, मुस्लिम सरसंघचालक कधी होणार? 

सपकाळ यांचा सवाल

पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील सलोख्याचे संबंध जगजाहीर आहेत. नेहरु यांनी डॉ. आंबेडकर यांना सन्मानाने देशाच्या पहिल्या कायदा मंत्रिपदाची जबाबदारी दिली. आज काँग्रेस पक्षाचा अध्यक्षही दलित समाजाचा आहे; पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला कधी करणार? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.
 

Related Articles