निळ्या हिर्‍याचा लिलाव पुढील महिन्यात   

किंमत सुमारे ४०० कोटी

नवी दिल्ली : तेलंगणातील गोवळकोंडा खाणीतून काढण्यात आलेल्या एका  ऐतिहासिक व दुर्मीळ निळ्या हिर्‍याचा लिलाव होणार आहे. या हिर्‍याची मालकी एकेकाळी इंदूर आणि बडोद्याचे महाराज यशवंतराव होळकर (द्वितीय) यांच्याकडे होती. १४ मे रोजी जिनिव्हा येथे हिर्‍याचा लिलाव केला जाणार आहे. 
 
निळा हिरा २३ ते २४ कॅरेटचा आहे. पर्शियन रचनहकार जार यांनी तो एका अंगठीत जडविला आहे. त्याची किंमत ३०० ते ४०० कोटी रुपये आहे. हिर्‍याला २५९ वर्षांचा इतिहास आहे. गोवळकोंडा खाणीतून काढण्यात आलेल्या दुर्मीळ हिर्‍याचा न्यूयॉर्क येथील क्रिस्टीज संस्थेतर्फे लिलाव केला जात आहे. हिर्‍याला राजघराण्यांचा वारसा लाभला आहे. त्यामध्ये आर्चड्यूक  जोसेफ यांचा समावेश आहे. राजघराण्याचा वारसा, अनोखा निळा रंग आणि मोठा आकार त्याचा आहे. जगातील दुर्मिळ हिर्‍यापैकी तो एक आहे, अशी माहिती क्रिस्टीज आंतरराष्ट्रीय लिलाव संस्थेचे सुवर्णकार राहुल काकडिया यांनी दिली. 
 
दरम्यान, यशवंतराव होळकर (द्वितीय) यांच्या वडिलांनी हिरा एका ब्रेसलेट्मध्ये फ्रान्सच्या संस्थेकडून बसविला. नंतर त्यात इंदूर पर्ल नावाचा आणखी एक हिरा जडविला. दोन्ही गोवळकोंडा खाणीतून काढले होते.  यानंतर ते नेकलेसमध्ये जडविले गेले. महाराणीच्या गळ्यात ते नेकलेस असल्याची चित्रे देखील तेव्हा काढली गेली होती. १९४७ मध्ये हिर्‍याला न्यूयॉर्क यथील सुवर्णकार ह्रॅरी विस्टन यांच्या रुपाने नवा मालक मिळाला. या नंतर या हिर्‍यासोेबत आणखी एक पांढरा हिरा एका साडी पीनमध्ये जडविला गेला. त्यानंतर ती साडीपिन बडोद्याच्या राजघराण्याकडे पुन्हा गेली. यानंतर हिरा खासगी कंपनीकडे गेला.   
 

Related Articles