पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार   

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधील परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात सोमवारी हिंसाचार झाला. भांगर येथे इंडियन सेक्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट केली आणि वाहनांची तोडफोड करत त्यांना आग लावली.  जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शांततेचे आवाहन केले आहे. भांगरमध्ये जमावाने पोलिसांच्या पाच दुचाकी आणि एका वाहनास आग लावली. तसेच, पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स जमावाने तोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिस आणि हल्लेखोर यांच्यात झटापट झाली. त्यात काही पोलिस जखमी झाले.

Related Articles