पाटणा : माजी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) साथ सोडली आहे. राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष (आरएलजेपी) यापुढे एनडीएचा भाग राहणार नाही, अशी घोषणा पारस यांनी सोमवारी केली. त्यामुळे, आता पारस ‘इंडिया’ आघाडीत सामील होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात विधानसभेच्या २४३ जागा असून सध्या नितीश कुमार यांचे सरकार आहे. भाजपही सत्तेत सहभागी आहे.मी २०१४ पासून एनडीएसोबत होतो. मात्र, यापुढे माझ्या पक्षाचा ‘एनडीए’शी कोणताही संबंध राहणार नाही, असे पारस म्हणाले.लोकसभा निवडणुकीत पारस यांच्या पक्षाला भाजपने एकही जागा दिली नव्हती. तर, रामविलास पास्वान यांचे पूत्र चिराग पास्वान यांच्या राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) पाच जागा जिंकल्या होत्या. यामध्ये हाजीपूरच्या जागेचा समावेश होता. रामविलास पास्वान आठ वेळा येथून निवडून आले होते.
Fans
Followers