मणिपूरच्या बिष्णुपूर, चुराचांदपूर जिल्ह्यात सुरक्षा वाढवली   

इम्फाळ : मैतेई समाजाचे पवित्र स्थळ असलेल्या थांगजिंग तराईच्या तीर्थयात्रेसाठी नागरिक मणिपूरमध्ये दाखल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बिष्णुपूर आणि चुराचंदपूर जिल्ह्यांत सोमवारी सुरक्षा वाढवण्यात आली. 
 
मैतेई समाजातील नागरिक थांगजिंग तराईच्या तीर्थयात्रेसाठी पोहचत असतानाच कुकी-जो समाजाच्या सदस्यांनी त्यांना ही यात्रा टाळण्याची विनंती केली. शेकडो कुकी-जो समुदायाच्या सदस्यांनी चुराचंदपूर जिल्ह्यातील थांगजिंग डोंगरावर मैतेई समुदायाला तिर्थयात्रा करण्यापासून रोखण्यासाठी रविवारी निदर्शने केली. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, पोलिसांनी बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाकता आणि फोगाकचाई इखाईमध्ये सुरक्षा तैनात केली.  
 
इम्फाळ खोर्‍यातील विविध भागांतील अनेक मैतेई तीर्थयात्री बिष्णुपूरमधील थांगजिंगमध्ये आले आहेत. तीर्थयात्रेसाठी मोइरांग व आसपासच्या परिसरात त्यांनी तळ ठोकला आहे. 

Related Articles