कन्नड अभिनेते जनार्दन चौहान यांचे निधन   

बेंगळुरू : कन्नड अभिनेते जनार्दन चौहान यांचे रविवारी रात्री उशिरा खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. कॉमेडी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले जनार्दन  ’बँक’ जनार्दन नावाने ओळखले जात होते. ते मूळचे चित्रदुर्ग जिल्ह्यातील होलालकेरे येथील रहिवासी होते. मागील वीस दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी किडनी निकामी होऊन मध्यरात्री अडीचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. 
 
जनार्दन यांनी अनेक दूरदर्शन मालिका आणि ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपटसृष्टीसोबतच त्यांनी एका बँकेतही काम केले आहे. त्यामुळे लोक त्यांना ‘बँक’ जनार्दन म्हणून ओळखले जायचे. अनेक नाटकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. 

Related Articles