महामानवाला अभिवादन   

मुंबई : राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास तसेच प्रतिमेस विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 
 
याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव शिवदर्शन साठ्ये, उप सचिव विजय कोमटवार, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती यांचे विशेष कार्य अधिकारी अविनाश रणखांब, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचार्‍यांनीही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.   

Related Articles