नारायणगाव आख्याड्यात राहुल फुलमाळी ‘हनुमान केसरी’   

नारायणगाव, (वार्ताहर) : हनुमान जयंतीनिमित्त येथील श्री  हनुमान, विठ्ठल, दत्त, महादेव मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने घेतलेल्या लाल मातीवरील कुस्त्यांच्या आखाड्यात पै. राहुल फुलमाळी याने अंतिम कुस्ती जिंकून हनुमान केसरी हा किताब पटकविला.
 
श्री क्षेत्र नारायणगावचे ग्रामदैवत श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्री हनुमान, विठ्ठल, दत्त, महादेव मंदिर देवस्थानच्या वतीने नारायणगाव येथे   शनिवार आठवडे बाजार येथील श्रीवत मैदानात कुस्तीचा आखाडा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पुणे, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातील सुमारे १८० नामवंत पहिलवानांनी भाग घेतला. ८० कुस्त्या निकाली झाल्या. निकाली कुस्ती करणार्‍या पहिलवानांना दोन लाख रुपयांचा इनाम रोख स्वरूपात वाटप करण्यात आला.अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष शिवदास तांबे, उपाध्यक्ष राजकुमार कोल्हे व संपर्क प्रमुख अशोक औटी, विश्वस्त मंडळ यांनी दिली.
 
स्वर्गीय गजानन औटी यांच्या स्मरणार्थ शैलेश औटी यांचे वतीने फिरती चांदीची गदा देण्यात आली. अंतिम कुस्ती राहुल फुलमाळी (पिंपळवंडी, ता. जुन्नर) विरुद्ध शिवाजी उचळे (शिरपूरता. पारनेर) यांच्यात झाली. ही कुस्ती अखेर शिवाजी उचळे याला चितपट करून राहुल फुलमाळी यांने जिंकली. चांदीची गदा व  खंडू पवार यांच्या वतीने ११ हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन पै फुलमाळी यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला. 
 
कुस्ती आखाड्यात पंच म्हणून क्रीडा मार्गदर्शक एच. पी. नरसुडे, आशिष कोल्हे, राहुल नवले, विनायक औटी, अजय कानडे,दादाभाऊ कोठाळे, रवी शिंदे, शैलेश कावळे, मेहबूब काझी यांनी काम पाहिले. 
 

Related Articles