माजी सभापती रामभाऊ बोरचटे यांचे निधन   

बेल्हे, (वार्ताहर) : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामभाऊशेठ कृष्णाजी बोरचटे यांचे बेल्हे येथे अल्पशा आजाराने राहत्या घरी देहावसान झाले. ते ८० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
 
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पडल्यानंतर त्यांनी बेल्हे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे साडे तीन दशकाहून अधिककाळ अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.ग्रामस्थांनी त्यांना ग्रामनेते उपाधी दिली. बेल्हे, गुंजाळवाडी, बांगरवाडी, कोंबरवाडी, यादववाडी, गावच्या जडणघडणेमध्ये त्याचा सिंहाचा वाटा होता. सहकार क्षेत्रात बरोबर राजकीय क्षेत्रात त्यांनी उत्तम काम केले तसेच त्यांच्या काळात अनेक कार्यकर्ते घडवण्याचे काम केले तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांची महत्त्वाची भूमिका होती. बोरचटे यांचा राजकीय क्षेत्रात मोठा धबधबा होता. शनिवारी सकाळी दहा वाजता बेल्हे गंगाद्वार स्मशान भूमीत मोठ्या जनसमुदायांच्या उपस्थितीत माजी सभापती रामभाऊ बोरचटे यांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Related Articles