मुलीला वाममार्गाला लावणार्‍या आईसह साथीदार अटकेत   

पुणे : बॉयफ्रेंडच्या मदतीने स्वतःच्या तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीची आक्षेपार्ह चित्रफित तयार करून आईनेच ती समाजमाध्यमावर पसरवल्याचा प्रकार समोर आला. तसेच, पीडीत मुलीला बॉयफ्रेंडसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडून तिच्यावर अत्याचार केला. पीडीत मुलीने पोलिसांत धाव घेताच, आरोपी आई मित्रासोबत फरार झाली. त्यानंतर, पोलिसांनी आरोपी आई व तिच्या बॉयफ्रेन्डला अटक केली.
 
बिबवेवाडी परिसरात पाच महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला. पीडीत मुलीच्या आईचे एका मुलासोबत विवाहबाह्य संबंध आहेत. तिच्या आईने याच बॉयफ्रेन्डसोबत मिळून पीडीत मुलीची आक्षेपार्ह चित्रफित मोबाईलवर काढली आणि नातेवाईकांना पाठवली. अल्पवयीन मुलीने आईचे आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या प्रेमसंबंधाची माहिती घर मालकिणीला दिली होती. त्याच रागातून नराधम आईने हे धक्कादायक कृत्य केले. त्यानंतर आरोपी बॉयफ्रेंडने पीडितेवर अत्याचार केले. या सगळ्या प्रकारानंतर पीडितेची आई आणि तिचा बॉयफ्रेंड फरार झाले होते. मात्र, बिबवेवाडी पोलिसांनी त्या दोघांना शनिवारी अटक केली आहे.
 
आरोपी आईच्या विवाहबाह्य संबंधांबाबत पीडीत मुलीला पाच महिन्यांपूर्वी समजले. ही बाब तीने घरमालकिणीला दिली होती. हे समजल्यानंतर पीडित मुलीच्या आईने तिला वारंवार त्रास देण्यास सुरुवात केली. यातच महिलेच्या बॉयफ्रेंडने पीडीत मुलीवर अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या आईने या सगळ्या प्रकाराची चित्रफित तयार करून ती नातेवाईकांना पाठवली आणि तीची बदनामी केली. यामुळे पीडीत मुलीला जबर धक्का बसला.
 
या प्रकारानंतर दोन्ही आरोपी पळून गेले. खडकवासला नांदेड गाव येथील एका चाळीत दोघेही राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून, पोलिसांनी सापळा रचून शनिवारी दोघांना अटक केली.
 

Related Articles