सलमान खानला ठार मारण्याची पुन्हा धमकी   

 मुंबई : अभिनेता सलमान खानला ठार मारण्याची पुन्हा धमकी देण्यात आली. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या हेल्पलाइन क्रमांकावर ती देण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.सलमान खानची मोटार स्फोटाने उडवून देण्यात येईल. तसेच घरात घुसून त्याला चिरडून टाकू, असे वाहतूक पोलिस शाखेच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेल्या धमकीत नमूद केले आहे. या संदर्भातील माहिती ज्येष्ठ अधिकार्‍यांना तातडीने देण्यात आली असून सतर्क राहण्याचे आदेशही जारी केले आहेत. भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३५१(२) (३) अंतर्गत अनोळखी व्यक्तीविरोधात वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून सलमानला ठार केले जाईल, अशा धमक्या वाहतूक शाखेकडे अनेकदा देण्यात आल्या आहेत. लॉरेन्स बिष्णोई टोळीने देखील सलमानला ठार मारण्याची धमकी यापूर्वी दिली होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सलमानच्या घराबाहेर गोळीबार, खुनाचा प्रयत्न आणि खंडणी प्रकरणी  लॉरेन्स बिष्णोईला अटक केली असून तो सध्या अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात आहे.  पनवेलजवळील फार्म हाऊसकडे जात असताना सलमानची हत्या करण्याचे कारस्थान देखील बिष्णोई टोळीने रचले होते, असा दावा नवी मुंबई पोलिसांनी केला होता. 

Related Articles