E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अभिवादनासाठी लोटला अनुयायांचा सागर
Samruddhi Dhayagude
15 Apr 2025
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती पुण्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सकाळपासूनच अभिवादन करण्यासाठी अनुयायांचा सोमवारी जनसागर लोटला होता. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणासह भीम गीतांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता.
पुणे स्टेशन परिसरातील आणि लष्कर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. अभिवादन करण्यास येणार्या अनुयायांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंडप टाकण्यात आला होता. मध्यरात्री बारा वाजता बुद्ध वंदना घेऊन अनेकांनी बाबासाहेबांचा जयजयकार केला. अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांनी रविवारी रात्री ११ वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठी गर्दी केल्याने संपूर्ण परिसर फुलून गेला होता. बाबासाहेबांची जीवनगाथा सांगणार्या गीतांमुळे अनुयायांमध्ये उत्साह संचारला होता. रात्रभर अभिवादनासाठी अनुयायांची ये-जा सुरूच होती.
शहर परिसरात विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था, राजकीय पक्षांच्या वतीने व्याख्याने, रक्तदान शिबीर, छायाचित्र व पुस्तक प्रदर्शन, शाहिरी पोवाड्यांच्या कार्यक्रमासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी येणार्या मिसळ व ताक बनविण्याच्या उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे अनुयायांनी अभिवादनासह भीम गीताच्या कार्यक्रमालाही प्रतिसाद दिला. तसेच अभिवादनासाठी येणार्यांना विविध संस्था, संघटनांकडून शीतपेय, ताक, खाद्यपदार्थ, चहा, पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
पुणे स्टेशनचा संपूर्ण परिसर रात्री बारापासून पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेल्या आबाल वृद्ध अनुयायांनी फुलून गेला होता. पुतळा परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही महापुरुषांचे फोटे, पोस्टर्स, निळ्या टोप्या, डॉ. आंबेडकर, भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांचे फोटो व पुतळ्यांची दुकाने सजली होती. त्याचबरोबर या महापुरुषांची पुस्तके, राज्यघटना घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. ठिकठिकाणी राज्यघटनच्या उद्देशिकेचे वाटप करण्यात येत होते.
उपनगरात जयंती उत्साहात
शहराप्रमाणे उपनगरात मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच सायंकाळी काही भागात मिरवणुका काढण्यात आल्या. या फेरीतही अनुयायी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीत डीजेचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. डीजेवर भीमगीते वाजविण्यात आली. त्यामुळे उपनगरातही सायंकाळनंतर भीममय वातावरण झाले होते.
स्वागत कमानींनी वेधले लक्ष
पुणे स्टेशन परिसरातील वातावरण काल आंबेडकरमय झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे येणार्या प्रत्येक रस्त्यांवर स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. संस्था, संघटनांकडून अनुयायांचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले होते. तसेच परिसरातील बहुतांश रस्त्यांवर दुतर्फा फलक लावण्यात आले होते. फलकावर डॉ. आंबेडकरांच्या दुर्मिळ फोटो लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे स्वागत कमानी आणि फलकांनी अनुयायांचे लक्ष वेधून घेतले.
घटनेच्या प्रतींचे वाटप करून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन
खराडी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संतुलन पाषाण शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना भारतीय लोकशाही समजून उमगली जावी, यासाठी संविधानाच्या प्रती वाटप करून अभिवादन करण्यात आले.
संतुलन पाषाण शाळेचे संस्थापक वकील बी. एम. रेगे म्हणाले, भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान प्रत्येक देशवासीयासाठी देशग्रंथ आहे. स्वातंत्र्यानंतरही मुलभूत हक्कासाठी गोरगरीब, अंगमेनहती, आदिवासी यांना झुंज देऊन झगडावे लागत आहे. दिवसेंदिवस वाढत्या मुस्कटदाबीमुळे आपले मूलभूत हक्क व कर्तव्य यापासून वंचित राहावे लागत असल्याने आर्थिक व सामाजिक विषमता वाढत आहे. वाढत्या विषमतेमुळे हक्क आणि कर्तव्यापासून दूर असलेला अर्धा मेला समाज वाढत असल्याची खंत वंचितासाठी रचनात्मक संघर्ष करणारे व्यक्त करून समाज व्यवस्थेत सुज्ञ नागरिक तयार होण्यासाठी भारतीय राज्यघटना महत्वाची आहे.संतुलन संस्थेच्या संचालिका संस्थापिका वकील पल्लवी रेगे यांनी प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. ’शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या मूलमंत्र्याची आठवण देऊन अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी शिक्षण आणि संघटन महत्त्वाचे असल्याचे मत मांडले.या कार्यक्रमात संतुलन पाषाण शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक व दगडखाण कामगार विकास परिषदेचे कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
आरपीआयच्या वतीने डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात
पुणे : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आरपीआय पक्षाच्या वतीने पुणे स्टेशन येथील पुतळ्यास प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले.
मानवंदना देण्यास येणार्या भीम अनुया्यांना आरपीआय पक्षाच्या वतीने पंधराशे किलो व्हेज पुलाव, पाचशे किलो लाडू, पाणी बॉटल व देशी झाडाची रोप वाटप करण्यात आली. राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, मंत्री मा. माधुरी ताई मिसाळ, मा. आमदार जयदेव रंधवे व अनेक पक्षाचे, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष संजय सोनवणे, शैलेंद्र चव्हाण, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, रोहिदास गायकवाड, संघमित्रा गायकवाड, बाबूराव घाडगे, शाम सदाफुले, वसंत बनसोडे, महेंद्र कांबळे, महीपाल वाघमारे, शोभा झेंडे, निलेश :जाहगीरदार, लियाकत शेख, भगवान गायकवाड, चिंतामन जगताप, शशिकांत मोरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे हे सातवे वर्ष असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, संजय सोनवणे, अशोक कांबळे, शैलेंद्र चव्हाण, शाम सदाफुले, निलेश रोकडे यांनी प्रयत्न केले.
महार रेजिमेंटकडून डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी पोस्ट कार्ड मोहिम
पुणे : महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात यावा या प्रमुख मागणी साठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी आरपीआय युवा मोर्चा व महार रेजिमेंटच्या निवृत्त अधिकारी व कर्मचार्यांच्या यशसिद्धी वेल्फेअर असोसिएशन च्या संयुक्त विद्यमाने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरामध्ये प्रधानमंत्री कार्यालयाला पोस्ट कार्ड पाठवण्याच्या अभियाना ची सुरुवात करण्यात आली.
सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या अभियानात दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे पंधरा हजार नागरिकांनी सहभाग दर्शवला. अंदाजे एक लाख पोस्टकार्ड पुणे शहरातून पाठवण्याचा मनोदय यावेळी आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला. यावेळी आरपीआय युवा मोर्चाचे राहुल डंबाळे व महार रेजिमेंटचे निवृत्त सैनिक कॅप्टन भगवान इंगोले, नायक सुरेश वानखडे, नायक धनराज गडबडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पोस्ट कार्ड पाठवण्याच्या मोहिमेमध्ये आंबेडकरी चळवतील ज्येष्ठ नेते वसंत साळवे, आरपीआय आठवले गटाचे प्रादेश संघटक परशुराम वाडेकर, अॅड. मोहन वाडेकर, भारत मुक्ती मोर्चाचे सचिन बनसोडे, रिपब्लिकन जनशक्तीचे शैलेंद्र मोरे, दलित पँथर ऑफ इंडियाचे बापूसाहेब भोसले, रिपब्लिकन सेनेचे युवराज बनसोडे, आरपीआय युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे विवेक बनसोडे, भिम सेवा प्रतिष्ठानचे राम डंबाळे, सिद्धांत सुर्वे, निखिल बहुले इत्यादी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे आयोजन प्रतीक डंबाळे, राहुल नागटिळक यांनी केले यावेळी महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा बसवण्यासाठी राज्यभरातून किमान दहा लाख पोस्ट कार्ड पाठवण्याचा मानस असल्याचे राहुल डंबाळे यांनी सांगितले.
Related
Articles
गौतम बुद्धांच्या दाताचे सोळा वर्षांनी दर्शन
19 Apr 2025
आवक वाढल्याने ज्वारी झाली स्वस्त
17 Apr 2025
उपचार नाकारणार्या रुग्णालयांवर कारवाई करा
18 Apr 2025
लोकमान्यांमुळे स्वातंत्र्य चळवळीला कर्मयोगाचे तत्वज्ञान : डॉ. दीक्षित
22 Apr 2025
वाचक लिहितात
17 Apr 2025
एर्दोगान यांच्या एकाधिकारशाहीला आव्हान!
20 Apr 2025
गौतम बुद्धांच्या दाताचे सोळा वर्षांनी दर्शन
19 Apr 2025
आवक वाढल्याने ज्वारी झाली स्वस्त
17 Apr 2025
उपचार नाकारणार्या रुग्णालयांवर कारवाई करा
18 Apr 2025
लोकमान्यांमुळे स्वातंत्र्य चळवळीला कर्मयोगाचे तत्वज्ञान : डॉ. दीक्षित
22 Apr 2025
वाचक लिहितात
17 Apr 2025
एर्दोगान यांच्या एकाधिकारशाहीला आव्हान!
20 Apr 2025
गौतम बुद्धांच्या दाताचे सोळा वर्षांनी दर्शन
19 Apr 2025
आवक वाढल्याने ज्वारी झाली स्वस्त
17 Apr 2025
उपचार नाकारणार्या रुग्णालयांवर कारवाई करा
18 Apr 2025
लोकमान्यांमुळे स्वातंत्र्य चळवळीला कर्मयोगाचे तत्वज्ञान : डॉ. दीक्षित
22 Apr 2025
वाचक लिहितात
17 Apr 2025
एर्दोगान यांच्या एकाधिकारशाहीला आव्हान!
20 Apr 2025
गौतम बुद्धांच्या दाताचे सोळा वर्षांनी दर्शन
19 Apr 2025
आवक वाढल्याने ज्वारी झाली स्वस्त
17 Apr 2025
उपचार नाकारणार्या रुग्णालयांवर कारवाई करा
18 Apr 2025
लोकमान्यांमुळे स्वातंत्र्य चळवळीला कर्मयोगाचे तत्वज्ञान : डॉ. दीक्षित
22 Apr 2025
वाचक लिहितात
17 Apr 2025
एर्दोगान यांच्या एकाधिकारशाहीला आव्हान!
20 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
3
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
4
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
5
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
6
बनावट पासपोर्ट प्रकरण