स्वारगेट-कात्रज मेट्रोचे काम तीन महिन्यांत सुरु होणार   

पुणे : स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला निधी देण्यास राज्य सरकारकडून हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले मेट्रोचे काम येत्या तीन महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. बालाजीनगर आणि बिबवेवाडी या स्थानकांसाठी वाढलेला ६८३ कोटी खर्चाला राज्य सरकार मंजूरी देणार आहे.
 
शहरात सर्वात जास्त वर्दळ यामार्गावर असते. त्यामुळे यामार्गावर मेट्रो सुरु व्हावी यासाठी मोठी मागणी आहे. याप्रकल्पाला मान्यता मिळालेली आहे. यामध्ये काही बदल केल्यामुळे अद्याप काम सुरु झाले नव्हते. बदलाला मान्यता मिळाल्यामुळे वाढीव कामासाठी निविदा काढण्यात येणार आहेत.
 
शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महामेट्रोकडून स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. ५.४६ किलोमिटरचा हा भुयारी मार्ग आहे. मेट्रोच्या आराखड्यात मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज अशी स्थानके प्रस्तावित करण्यात आली होती. नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्या आग्रहास्तव बालाजीनगर आणि बिबवेवाडी ही दोन स्थानके करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही दोन स्थानकांच्या मंजुरीसाठी महामेट्रोकडुन राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. महापालिकेने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. मात्र महापालिका वाढीव खर्च उचलणार नाही असे जाहिर केले. राज्य सरकारकडे हा प्रस्तावाला आता हिरवा कंदिल दिला आहे.त्यामुळे विस्तारित मेट्रो मार्गाचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
महामेट्रोकडून नियोजित स्वारगेट- कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गासाठी चार महिन्यापुर्वी निविदा काढण्यात आल्या होत्या. यामध्ये बालाजीनगर आणि बिबवेवाडी या स्थानकांचा समावेश नव्हता.यामुळे महामेट्रोकडून पुन्हा निविदा काढण्यात येणार आहेत. निविदेला ४० दिवासांची मुदत देण्यात आली आहे. निविदेला मंजूरी मिळाल्यानंतर तीन ते चार महिन्यात कामाला सुरुवात होणार आहे.
 
स्वारगेट ते कात्रज भुयारी मार्गिका प्रकल्पासाठीचा वाढीव खर्च राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे आता पाच स्थानके होणार असल्याने निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. पुढील दनि ते तीन महिन्यात यामार्गाचे काम सुरु होणार आहे.

- हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो

 

Related Articles