E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
डॉ. आंबेडकर यांना लाखो अनुयायांकडून अभिवादन
Samruddhi Dhayagude
15 Apr 2025
पुणे : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आणि कॅम्प परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी गर्दी केली.विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी स्नेहा दिसवे-देवकाते, तहसीलदार सुर्यकांत येवले, निवासी नायब तहसीलदार शंकर ठुबे आदी उपस्थित होते.
नगरविकास-परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी डॉ. आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी विविध क्षेत्रातील उपस्थित होते.डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण पुणे विभाग, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन विश्रांतवाडी येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात सामाजिक समता सप्ताहाराचा समावेश करण्यात आला. यावेळी प्रादेशिक उपायुक्त वंदना कौचुरे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती पुण्याचे उपायुक्त संजय दाणे, संशोधन अधिकारी संतोष जाधव, सहायक आयुक्त विशाल तोठे, सहायक लेखाधिकारी चव्हाण उपस्थित होते.
यावेळी कौचुरे यांनी ११ ते १४ एप्रिल या कालावधीत क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची जयंती साजरी करण्याच्या हेतुबाबत माहिती दिली, तसेच महामानवांचे कार्य, त्यांचे विचार आपल्याकडून अपेक्षित असलेल्या वर्तणूक आदिबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. राणे यांनी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने विविध महाविद्यालयांमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणीचे विशेष शिबिराचे आयोजन करून विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले आहे.सहायक आयुक्त लोंढे यांनी डॉ. आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार घेऊन जीवनाची वाटचाल यशस्वी करण्याबाबत मार्गदर्शन केले.
सामाजिक व न्याय विभागाच्या योजनांचा लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये परदेशी शिष्यवृत्ती योजना प्रभावीपणे राबविण्यास सहकार्य करणार्या शैक्षणिक संस्था, पारलिंगी व्यक्तीसाठी कार्य करणार्या स्वंयसेवी संस्था, पुणे शहरातील वृद्धाश्रमाचे संचालक, मिनी ट्रॅक्टर योजना, डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. सानिका जाधव यांनी ‘मी रमाबाई बोलतेय’ या एकपात्री नाटकाचा प्रयोग सादर केला.
समाजवादी पक्षातर्फे अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली लोकशाही जपण्यासाठी समाजवादी पक्ष कटिबद्ध आहे. संविधानातील मुल्यांच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढण्याचा समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त निर्धार केला आहे.
पुणे स्टेशन येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी समाजवादी पक्षाचे पुणे शहराध्यक्ष जांबुवंत मनोहर, अनिस अहमद प्रदेश सरचिटणीस, साधना शिंदे जिल्हाध्यक्षा, दत्ता पाकिरे शहर सरचिटणीस, विनायक लांबे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, अनिरुद्ध सुर्यवंशी शहर उपाध्यक्ष, शहाजहान झारी शहर चिटणीस, वसंतराव कोळी खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष, जावेद शेख छत्रपती शिवाजी महाराज नगर मतदारसंघ अध्यक्ष, अशोक गायकवाड शहर कार्यकारिणी सदस्य, इब्राहिम यवतमाळवाले, सलिम बडगेर, भारत मालुसरे, सुरेश कांबळे आदी उपस्थित होते.
महिला काँग्रेसच्या वतीने अभिवादन
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा संगिता तिवारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला यावेळी सोनिया ओव्हाळ, बेबी राऊत, रजिया बल्लारी, मनिषा गायकवाड, सीमा महाडीक, कविता गायकवाड, सुनिता नेमूर, सुवर्णा माने, स्वरा शिलेदार रेहाना शेख, जागृती ढेरे आदी महिला उपस्थित होत्या.
पुणे जिल्हा बहुजन विकास आघाडीच्या वतीने अभिवादन
डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष धनंजय घोलप यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी धनंजय घोलप, सनी रायकर, अरविंद बहुले, सागर शिंदे, ललित जाधव, ज्ञानेश्वर सरडे, मच्छिंद्र सुपेकर, गुलाम दस्तगीर शेख, विशाल पाटोळे, मोहम्मद प्यारे हकिम, जावेद मदारी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
Related
Articles
वाहतुकीला अडथळा ठरणारे विजेचे खांब काढण्याची मागणी
19 Apr 2025
इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात सहा पटीने वाढली
19 Apr 2025
वाचक लिहितात
22 Apr 2025
आवक वाढल्याने ज्वारी झाली स्वस्त
17 Apr 2025
महाबळेश्वरमध्ये तीन दिवस ’नो टोल झोन’
22 Apr 2025
काँग्रेसची देशभर निदर्शने
17 Apr 2025
वाहतुकीला अडथळा ठरणारे विजेचे खांब काढण्याची मागणी
19 Apr 2025
इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात सहा पटीने वाढली
19 Apr 2025
वाचक लिहितात
22 Apr 2025
आवक वाढल्याने ज्वारी झाली स्वस्त
17 Apr 2025
महाबळेश्वरमध्ये तीन दिवस ’नो टोल झोन’
22 Apr 2025
काँग्रेसची देशभर निदर्शने
17 Apr 2025
वाहतुकीला अडथळा ठरणारे विजेचे खांब काढण्याची मागणी
19 Apr 2025
इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात सहा पटीने वाढली
19 Apr 2025
वाचक लिहितात
22 Apr 2025
आवक वाढल्याने ज्वारी झाली स्वस्त
17 Apr 2025
महाबळेश्वरमध्ये तीन दिवस ’नो टोल झोन’
22 Apr 2025
काँग्रेसची देशभर निदर्शने
17 Apr 2025
वाहतुकीला अडथळा ठरणारे विजेचे खांब काढण्याची मागणी
19 Apr 2025
इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात सहा पटीने वाढली
19 Apr 2025
वाचक लिहितात
22 Apr 2025
आवक वाढल्याने ज्वारी झाली स्वस्त
17 Apr 2025
महाबळेश्वरमध्ये तीन दिवस ’नो टोल झोन’
22 Apr 2025
काँग्रेसची देशभर निदर्शने
17 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
3
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
4
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
5
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
6
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!