‘फुले-आंबेडकर विरुद्ध फडणवीस’ असा हा झगडा आहे : संजय राऊत   

मुंबई : महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित फुले चित्रपट २५ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.तरीही ‘फुले’ चित्रपटास विरोध सुरू आहे. महाराष्ट्रात ‘फुले-आंबेडकर विरुद्ध फडणवीस’ असा हा झगडा आहे! मुख्यमंत्री फडणवीस या सामाजिक विषयावर गप्प का बसले आहेत? त्यांनी मौन सोडावे. नाहीतर हा झगडा ‘फुले विरुद्ध फडणवीस’ असाच आहे यावर शिक्का बसेल अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत केली आहे.संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपला सवाल केला आहे. 'द काश्मीर फाईल्स','छावा'  या चित्रपटांवर आक्षेप घेतला नाही, मग याच चित्रपटावर आक्षेप घ्यायचे काय कारण आहे ते स्पष्ट करा. सामनाच्या अग्रलेखातून केलेल्या या टीकेवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. 
 
चंद्रशेखर बावनकुळे नेमका काय म्हणाले -
 
कधी काळी उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होते, या गोष्टीवर विश्वास बसू नये,असाच त्यांचा सध्याचा वावर आहे. ‘सामना‘ तील अलीकडच्या काही दिवसांतील अग्रलेख हे उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्टया संपविण्यासाठी संजय राऊतांकडून लिहिले जात आहेत, अशी शंका खुद्द उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या माणसांकडूनच व्यक्त केली जात आहे. अकलेचा कांदा. म्हणजे कोण तर याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला चांगलंच ठाऊक आहे. हो तेच बिनबुडाचे चंबू! रोज सकाळी उठून आपणच किती ग्रेट, थोर, विचारवंत आहोत असे भासवण्याचा ज्यांना ऊत येतो तेच! ते कोण आहेत? हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. आजही त्यांनी भांडण लावण्याचा केविलवाणा प्रयत्न महाराष्ट्रात केला. सत्ता गेली की व्यक्ती किती अगतिक होतो, बरळू लागतो, आजूबाजूचे पिवळे दिसू लागते. महात्मा जोतिबा फुले यांच्यावरील चित्रपटावरून त्यांना मानसिक ऊत आला, त्यांनी गरळ ओकली. लोकनेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले. अर्थात, ज्यांनी आरोप केले त्यांना खरंतर बुडंच नाही. काय तर म्हणे, फुले विरुद्ध फडणवीस!! अरे महाभागा, तुमची बुद्धी गचाळ होत चालली आहे.  

Related Articles