धानोरीत तोंडावर मुखवटे आणि हातात कोयता घेऊन दहशत   

 

पोलिस आयुक्तांकडे नागरिकांची तक्रार
 
धानोरी : सोसायटीत बेकायदेशीर घुसून तीन व्यक्तींनी काळ्या कपडे घालून तोंडावर मुखवटा आणि कोयत्या सारखा धारदार शस्त्रे हातात घेऊन दहशत पसरविण्याची घटना धानोरी परिसरात घडल्याने नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडीस आला आहे.
 
धानोरी भागातील सिद्रा गार्डन सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये ८ एप्रिला ही घटना घडली आहे. सशस्त्र आणि मुखवटे घातलेल्या व्यक्तींनी घुसखोरी करून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. या व्यक्तींनी काळ्या कपड्यांमध्ये, कोयत्यासारखी शस्त्रे हातात घेऊन, सोसायटीच्या आवारात संशयास्पद हालचाली केल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांची ही हालचाल स्पष्टपणे दिसून आली आहे.या घटनेनंतर, रहिवाशांचे व सोसायटीचे वतीने यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात आणि पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. 
 
चार ते पाचच्या दरम्यान, तीन अज्ञात सशस्त्र व्यक्तींनी आमच्या इमारतीत बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यांनी एका फ्लॅटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली अशी तक्रार करण्यात आली आहे. विश्रांतवाडी  पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोसायटीत अशाच प्रकारे कोयते घेऊन काही तरुणांनी दहशत निर्माण केली होती. तसेच वस्तीत दारावर कोयते मारून नागरिकात भीती पसरवली होती. आता पुन्हा धानोरीत सशस्त्र आणि मुखवटे घातलेल्या तीन व्यक्तींनी दहशत पसरवली आहे. नागरिकांमध्ये या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोसायट्यांमध्ये घुसखोरी वाढत चालल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी कमी प्रमाणात रात्रीचे गस्त घालत असल्याची ही तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. या आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. 
 

Related Articles