अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्धाचा पाकिस्तानला फटका   

वॉशिंग्टन : अमेरिकेने चीनवर जास्त शुल्क (टॅरिफ) लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम आता केवळ चीनवरच नाही तर पाकिस्तानवरही दिसून येत आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या शेअर बाजारात घसरण झाली आहे. अमेरिकेने पाकिस्तानवर २९ टक्के अतिरिक्त कर लादण्याची चर्चाही केली आहे, परंतु सध्या तो ९० दिवसांसाठी स्थगित करण्यात आला आहे. असे असूनही, पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे.
 
चीनचा शेअर बाजार, जो टॅरिफ लागू करण्यापूर्वी चांगली कामगिरी दाखवत होता, तो आता मंदावला आहे. शुक्रवारी, शांघाय स्टॉक इंडेक्समध्ये फक्त १४ अंकांची किंचित वाढ दिसून आली. गेल्या पाच दिवसांत त्यात तीन ते चार टक्क्यांनी घट झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून त्याचा वायटीडी परतावा 
-३.३९ टक्के आहे. गेल्या वर्षी, हा निर्देशांक ५२ आठवड्यांच्या उच्चांक तीन हजार ६७४.४० ला पोहोचला होता, परंतु आता तो दोन हजार ६८९.७० वर घसरला आहे.
 
पाकिस्तानी बाजारपेठेत घसरण
 
अमेरिकेने चीनवर आणि पाकिस्तानवर २९ टक्के परस्पर शुल्क लादल्यानंतर, सोमवारी पाकिस्तानी बाजारपेठेत इतकी मोठी घसरण झाली, की त्यांना व्यापार थांबवावा लागला. बुधवारीही, केइली -१०० दोन हजार ६४०.९५ अंकांनी किंवा २.२९ टक्क्यांनी घसरून ११२,८९१.४८ वर बंद झाला. शुक्रवारीही पीएसकेमध्ये अस्वस्थता दिसून आली. पाकिस्तानी बाजार ४२४.२१ अंकांनी घसरण होऊन ११५,७६५ वर बंद झाला.
 
चीन कोणाला घाबरत नाही : जिनपिंग 
 
चीन कधीही कोणावर अवलंबून राहिलेला नाही, आणि कधीही कोणाला घाबरलेला नाही. गेल्या ७० वर्षांत देशाने स्वावलंबन आणि कठोर संघर्षातून विकास साधला आहे. चीन कधीही इतरांच्या दयेवर अवलंबून राहिलेला नाही, तसेच कोणत्याही अन्याय दडपशाहीला कधीही घाबरलेला नाही. बाहेरील जगात कोणतेही बदल झाले तरी चीन आशावादी राहील आणि आपले व्यवहार चांगल्या प्रकारे चालवण्यावर लक्ष केंद्रित करेल, असे स्पष्ट मत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी व्यक्त केले.

Related Articles