अन्यथा तुरुंगात डांबू   

परदेशी नागरिकांना ट्रम्प यांचा इशारा

वॉशिंग्टन : अमेरिकेत राहणार्‍या परदेशी नागरिकांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने नवा नियम लागू केला आहे. यापुढे अमेरिकेत ३० दिवसांहून जास्त काळ राहणार्‍या परदेशी नागरिकांना स्वत:हून नोंदणी करावी लागेल. जर त्यांनी ते केले नाही, तर त्यांना दंड ठोठावला जाईल. तुरुंगामध्येही जावे लागू शकते, तसेच त्यांच्या देशात पाठविण्याची कारवाईही केली जाऊ शकते. 
 
गृह सुरक्षा विभागाने हा नवीन आदेश जारी केला आहे. ज्यानुसार, ३० दिवसांहून अधिक काळ अमेरिकेत राहणार्‍या परदेशी नागरिकांना फेडरल गव्हर्नमेंट अंतर्गत स्वत:ची नोंदणी करावी लागेल. त्यांनी या नियमांचे पालन केले नाही, तर तो गुन्हा ठरेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अमेरिकेत बेकायदा राहणार्‍या नागरिकांविरोधात मोहीम हाती घेत कठोर पाऊले उचलली आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे ट्रम्प सरकारने हा नवीन नियम लागू केला आहे.
 
स्वतःहून हद्दपार न झाल्यास एक ते पाच डॉलरपर्यंत दंड
 
• अमेरिकेत बेकायदा राहणार्‍यांनी स्वत:हून देशातून हद्दपार व्हावे अथवा नोंदणी करावी. ट्रम्प आणि गृह सुरक्षा सचिव क्रिस्टी नोएम यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत लिहिले, की जर एखाद्याला अंतिम हद्दपारीचा आदेश मिळाला आणि त्यानंतरही त्याने अमेरिका सोडली नाही, तर त्याला प्रतिदिन ९९८ डॉलरपर्यंत दंड भरावा लागू शकतो. अमेरिकेतून स्वत:ला डिपोर्ट करू न शकणार्‍यांना एक हजार ते पाच हजार इतका दंड आणि काही काळ जेलही होऊ शकते.
 
एच-१ व्हिसाचे काय होणार?
 
• ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय थेट अशा नागरिकांना परिणामकारक ठरणार नाही जे एच-१बी अथवा विद्यार्थी परवाने घेऊन अमेरिकेत राहत आहेत, तसेच इतर परदेशी नागरिकांना हा नियम लागू असेल. एच१-बी व्हिसा हा एखाद्याची नोकरी गेल्यानंतर, तो ठराविक वेळेत देशाबाहेर गेला नाही, तर त्यावर कारवाई होऊ शकते. नव्या नियमामुळे आता विद्यार्थी आणि एच-१बी व्हिसा धारकांना मुदतीत त्यांची कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करावी लागेल. अन्यथा त्यांना स्वत:हून कुठल्याही विमानाने त्यांच्या देशात जाता येईल. त्याशिवाय स्व-निर्वासन भविष्यात कायदेशीर स्थलांतरासाठी संधी उघडेल, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 

Related Articles